Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डाळिंब्याच्या सालींपासून घरच्या घरी बनवा माऊथवॉश !

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

     छायाचित्र सौजन्य –Shutterstock

तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी बाजारात अनेक माऊथवॉश उपलब्ध आहेत. मात्र त्यामधील केमिकल्स त्रासदायकही ठरू शकतात. म्हणूनच अशा केमिकलयुक्त माऊथवॉशएवजी घरागुती आणि नैसर्गिक माऊथवॉशचा वापर करा. डाळिंब्याची साल ही फळाप्रमाणेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल. अ‍ॅन्टिऑक्सिडंट असते. त्यामुळे डाळींब्याची सालं फेकून न देता त्यापासून माऊथवॉश बनवा. यामुळे माऊथ अल्सर, दुर्गंधी अशासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. या ’8′ आश्चर्यकारक कारणांमुळे वाढते तोंडाची दुर्गंधी ! हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

कसे ठरते फायदेशीर?

Journal of Advanced Pharmaceutical Technology & Research च्या संशोधनानुसार, डाळिंब्यामधील अ‍ॅन्टीमायक्रोबियल क्षमता Streptococcus mutans या बॅक्टेरियाचा नाश करण्यास मदत करते. दातांमधील कॅव्हिटी, तोंडाला येणारी दुर्गंधी अशा समस्यांमध्ये या बॅक्टेरियामुळे अधिक चालना मिळते.तसेच डाळींब्याच्या रसामध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव कमी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तोंडाचा कॅन्सर कमी होण्यासाठी मदत होते. तसेच डाळींब्याच्या सालीमुळे किमान 10 मिनिटे तोंड स्वच्छ केल्यास लाळीतील pH पातळी सुधारते. या ’4′ प्रकारे हृद्यरोगांना दूर ठेवेल ग्लासभर डाळींब्याचा ग्लासभर रस

घरच्या घरी कसे बनवाल डाळींब्याच्या सालीपासून माऊथवॉश ?

डाळींब्याच्या सालींपासून घरच्या घरी बनवला जाणारा हा माऊथवॉश वापरणे सुरक्षित आहे. मग पहा या माऊथवॉशची स्टेप बाय स्टेप कृती -:

  • मध्यम आकाराच्या डाळिंब्याचे चार काप करा. त्यामधील दाणे बाजूला काढा. त्यामधील पिवळी साल देखील बाजूला काढा. अन्यथा कडवट चव येते.
  • डाळींब्याची सालं काही दिवस थेट सूर्यप्रकाशात ठेवा. यामुळे त्यामधील मॉईश्चर ( पाण्याचा अंश) पूर्ण सुकून जाईल. डाळिंब्याची साल पूर्ण सुकल्यावर कडक होईल.
  • सुकलेल्या सालींचा अगदी बारीक स्वरूपातील पावडर करा.
  • 20 ग्रॅम डाळींब्याच्या सालींची पावडर एक लीटर पाण्यामध्ये मिसळा. हे मिश्रण काही मिनिटे  उकळा. त्यानंतर गाळून ते थंड करा.
  • त्यानंतर तुम्ही या पाण्याचा वापर माऊथवॉश म्हणून करून शकता.
  • डाळींब्याच्या सालीपासून तयार केलेला माऊथवॉश तुम्ही बाटलीमध्ये भरून फ्रीज मध्ये साठवून ठेऊ शकता.

सालींप्रमाणेच डाळिंबाचे ’10′ आरोग्यदायी फायदेदेखील नक्की जाणून घ्या.

References

Umar, Dilshad et al. ‘The Effect of Pomegranate Mouthrinse on Streptococcus Mutans Count and Salivary pH: An in Vivo Study.’ Journal of Advanced Pharmaceutical Technology & Research 7.1 (2016): 13–16. PMC. Web. 1 July 2016.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>