Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
एखाद्या अपघातात हाड दुखावले, तुटले तर फ्रॅक्चर करावे लागते, प्लॅस्टर करावे लागते. त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच त्या दुखण्यातून यशस्वीरित्या आणि लवकर बाहेर पडण्यासाठी सिनियर ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. महेश महेश्वरी यांनी सुचवलेले हे उपाय तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरतील.
फ्रॅक्चरमध्ये कोणत्या गोष्टी कराल ?
- आराम करतानादेखील पायाची बोटं गोलाकार दिशेने थोडा वेळ फिरवा. हालचालीशिवाय त्यांच्यामधील संवेदनशीलता कमी कमी होतील.
- शरीराचा एखादा भाग प्लॅस्टरमध्ये असल्यास तो उशी किंवा लोडच्या सहाय्याने थोडा वर (उंचावर) ठेवावा.
- तुमच्या पायाचा अंगठा किंवा बोटं काळी पडत असल्यास, दुर्गंधी येत असल्यास, दुखत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच जळजळ जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- ज्या भागाला फ्रॅक्चर झाले आहे तो भाग वगळता इतर भागांची नियमित हालचाल करा. यामुळे शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत चालते.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषध घेऊ नका. तसेच घरगुती उपचारदेखील डॉक्टरांच्या सल्ल्याने करा.
कोणत्या गोष्टी टाळाल ?
- प्लॅस्टरमधील हात किंवा पाय कोणत्याही रखरखीत जागेत ठेवू नका. अन्यथा त्याला क्रॅक जाण्याची शक्यता असते.
- पाण्यापासून दूर रहा. फ्रॅक्चर झालेल्या अवयवाला, भागाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या प्लॅस्टरचे यामुळे नुकसान होऊ शकते.
- प्लॅस्टर केल्यानंतर अनेकांना त्या भागाला खाज येते. अशावेळी खाजवण्यासाठी एखाद्या शार्प वस्तूचा वापर करणे टाळा.
- प्लॅस्टरमध्ये कॉईन किंवा लहानशी वस्तू ठेऊ नका.
- स्वतःहून प्लॅस्टर हलवू नका, त्यामध्ये बदल करू नका. ते काम डॉक्टरांचे आहे. त्यांना करू द्यावे.
प्लॅस्टर किंवा फ्रॅक्चर असल्यास आहारातही बदल करावे. असे काहींना वाटते. परंतू आहारात तसे बदल करायची गरज नसल्याचा सल्ला डॉ.महेश्वरी यांनी दिला आहे.
Image source: Shutterstock