Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

खोकल्याची ढास रात्री झोपेत का वाढते ?

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

   छायाचित्र सौजन्य – Shutterstock

पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास अनेकांना होतो. दिवसभर फारसा त्रास न देणारा खोकला मध्यरात्री झोपेच्या वेळी अधिक तीव्र होतो. त्यामुळे रुग्णासोबतच घरातील इतर व्यक्तींचीही झोपमोड होते.

रात्री नेमके काय होते ज्यामुळे खोकल्याचा त्रास अधिक तीव्र होतो हे जाणून घेण्यासाठी नयाती मल्टी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्सच्या कन्सलंट डॉ. ज्योती गोयल यांचा हा सल्ला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

रात्रीच्या वेळेस झोपल्यावर खोकला वाढण्यामागे ही आहेत खास कारणं – :

  1. सायनस इंफेक्शन आणि अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये इंफेक्शन असल्यास खूप प्रमाणात कफ निर्माण होतो. दिवसा आपण गिळतो किंवा बाहेर टाकतो. मात्र झोपेत घशाच्या मागील बाजूने तो सतत खेचला जातो. त्यामुळे खोकला वाढतो.
  2. झोपण्याच्या स्थितीमध्ये अनेकदा पोटातील काही गोष्टी अन्ननलिकेपर्यंत किंवा घशाच्या मागच्या बाजूला येते. रात्री भरपेट जेवल्यानंतर हा त्रास होतो.
  3. काही वेळेस अ‍ॅलर्जीमुळेदेखील रात्रीच्या वेळेस खोकला वाढतो.
  4. घरातील शुष्क हवादेखील खोकला वाढवण्यास कारणीभूत ठरतो. रात्रीच्या वेळेस श्वसननलिका अधिक संवेदनशील होतात. श्वसनाच्या विकारांची ही ’7′ कारणं आणि संकेत वेळीच ओळखा 

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल ?

कफासोबतच ताप,श्वसनामध्ये अडथळा जाणावत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खोकताना विशिष्ट प्रकारचा आवाज येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. असा खोकला एका आठवड्यापेक्षा अधिक काळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. ताप, दातदुखी, डोकेदुखीच्या समस्यांमध्ये कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ?

OTC ड्र्ग्स फायदेशीर आहेत का  ?

शुष्क खोकल्यामध्ये Over the counter drugs म्हणजेच साध्या औषध गोळ्या तात्पुरता आराम देतात. साध्या कफाच्या त्रासामध्ये अशाप्रकारच्या औषधांची गरज नाही. काही दिवसात आपोआप हा त्रास कमी होतो. या उपायांनी घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम !

खोकल्याची समस्या त्रासदायक असल्याचे जाणवल्यास योग्य प्रमाणात कफ सप्रेसंट घ्यावे. त्याच्या मात्रेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा झोप येणे, पोटात बिघाड होणे अशा समस्या वाढू शकतात. खोकल्याच्या प्रकारानुसार कसे निवडाल योग्य कफ सिरप ?


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>