Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

PCOS आणि PCODच्या समस्येवर नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरतात का ?

$
0
0

 

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

     छायाचित्र सौजन्य – Shutterstock

तरूणींमध्ये आजकाल पीसिओडी म्हणजेच polycystic ovarian diseases  किंंवा पीसीओएस polycystic ovarian syndrome चे प्रमाण वाढत असल्याचे आढळत आहे. या वेदनादायी त्रासामध्ये मासिकपाळीची अनियमितता, वजन वाढणे, अ‍ॅक्ने वाढणे, गर्भधारणेमध्ये दोष निर्माण होणे अशा अनेक समस्या आढळतात. त्यावर वेळीच वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवता येते. मात्र अनेकजणी डॉक्टरांच्या उपचारांंपेक्षा घरागुती आणि नैसर्गिक उपचारांना प्रथम प्राधान्य देतात. पण PCOS च्या या ’7′ लक्षणांकडे दुर्लक्ष मूळीच करू नका !

मेथी, अळशी अशा नैसर्गिक उपायांनी पीसीओएसच्या समस्यावर आराम मिळवा या आशयाचे अनेक उपचार सुचवले जातात. पण यामुळे मासिकपाळीतील दोष कमी करणे शक्य आहे का ? हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा Mother’s Lap IVF Centre च्या मेडिकल डिरेक्टर डॉ. शोभा गुप्ता यांचा हा खास सल्ला

 PCOS/PCOD च्या आजारांमध्ये नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात का ?

 PCOS आणि PCOD च्या समस्यांमागे शरीरात हार्मोनल असंतुलन कारणीभूत असते. सोबतच जीवनशैलीतीलही बदलही हा त्रास वाढवू शकतात. त्यामुळे वैद्यकीय मदत फार आवश्यक आहे. जंकफूड खाणे टाळणे, वजन आटोक्यात ठेवणे यासवयी हार्मोन्सच्या असंंतुलनामुळे वाढणारा लठ्ठठपणा आटोक्यात ठेवतो. तसेच हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणेदेखील आवश्यक आहे. औषधांसोबत या सवयी अवलंबल्यास नैसर्गिकरित्या असंंतुलन कमी होते.  PCOD चा त्रास कमी करण्यासाठी आहारात ठेवा हे ’6′ पदार्थ

हर्ब्स किंवा बीया PCOS आणि PCOD चा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत करू शकतात का ?

हर्ब्स किंवा बीयांचा वापर करण्यात काहीच हरकत नाही. काही अभ्यासांच्या मते, अळशी आणि मेथीदाणे शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण आटोक्यात ठेवते. मात्र त्याचा वापर करण्यांंनी नियमित चाचणी करून हार्मोन्सची पातळी तपासणे गरजेचे आहे. प्रामुखाने PCOD  आणि लठ्ठठपणाचा त्रास असणार्‍यांनी केवळ नैसर्गिक उपायांवर अवलंबून राहणे फायदेशीर नाही. त्यांंच्यासाठी जीवनशैलीत बदल करणेदेखील गरजेचे आहे. सोबतच औषधोपचारांची मदत घेणे गरजेचे आहे. त्यावर उपचार न केल्यास स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. परिणामी infertility, बाळ होण्यामध्ये दोष किंवा शरीरावरील अनावश्यक केसांची अतिरिक्त वाढ होणं अशा समस्या वाढू शकतात.

हा त्रास आटोक्यात कसा आणावा ?

PCOS किंवा PCOD चा त्रास कमी करण्यासाठी डाएट म्हणजे खाणे-पिणे, व्यायाम आणि वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. तुम्ही नैसर्गिक उपचारांची मदत घेणार असाल तर हार्मोन्सची पातळी नियमित तपासणेदेखील आवश्यक आहे. हे विसरू नका.  PCOS किंवा PCOD  वर उपचार न केल्यास स्त्रियांमध्ये infertility चा त्रास वाढू शकतो. त्यामुळे स्वतः उपचार ठरवणे टाळा. त्याऐवजी डॉक्टरांची मदत घ्या.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>