Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Irritable Bowel Syndromeचा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

  छायाचित्र सौजन्य – Shutterstock

खाण्याच्या, झोपण्याच्या चूकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये आयबीएस चा त्रास वाढत आहे. या त्रासामुळे काही पदार्थांच्या सेवनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आयबीएसचा त्रास कमी करण्यासाठी औषधोपचारांसोबतच आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत. मग फोर्टीस हॉस्पिटल्सच्या आहारतज्ञ डॉ.नेहा गुप्ता यांनी दिलेला हा सल्ला नक्की तुम्हांला नक्कीच फायादेशीर ठरेल.

 

सोल्युबल फायबर्स : सोल्युबल फायबर्सनीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आयबीएसच्या लक्षणांवर मात करणे शक्य होते. डायरिया किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. सोबतच पचनक्रिया सुधारते. त्यामुळे कडधान्यांऐवजी  फळं, भाज्यांमधून अधिकाधिक सोल्युबल फायबर आहारात घ्या.

 

आहार ग्ल्युटेन फ्री ठेवा: तुम्हांला ग्ल्युटेनयुक्त पदार्थांचा त्रास होत असल्यास आयबीएसचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे बार्ली, गहू यांचा आहारातील समावेश कमी करा.

 

कॅफिनयुक्त, कार्बोनेटेड डिंक्स किंवा अल्कोहल टाळा : कॅफिनयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे गॅस्ट्रोइंटेन्शियल मार्गाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो.  यामुळे डायरियाचा त्रास वाढल्याने डिहायड्रेशनचा त्रासही वाढू शकतो. कार्बोनेटेड डिंक्समध्ये गॅस असल्याने त्रास होतो. अल्कोहलदेखील पचनमार्गात बिघाड निर्माण करतात परिणामी डीहायाड्रेशनचा त्रास वाढतो.

 

फॅटी फूड्स टाळा : डाएटरी फॅट यांचे प्रमाण वाढल्यास steatorrheaचा त्रास वाढतो. यामध्ये शौचाला उग्र वास येतो, वेदना होतात. फॅट्समुळे आतड्यांना त्रास होतो. त्यामुळे तळलेले पदार्थ, अ‍ॅनिमल फॅट्स यांचा वापर कमी करून भाज्या,फळं यांचा समावेश वाढवा.

 

गॅस वाढवणारे पदार्थ टाळा: ब्रोकोली, बिन्स, कोबी, फ्लॉवर यासारख्या पोटात गॅस वाढवणार्‍या भाज्यांचा आहारातील समावेश कमी करा. यासोबतच लसूण, कांदा यांचा वापरही प्रमाणात करा. कडधान्य अधिकप्रमाणात खाल्यास बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगचा त्रास वाढतो. त्यामुळे त्याचा वापर प्रमाणात करावा.

 

दुग्धजन्य पदार्थांना टाळा: दुग्धजन्य पदार्थांच्या अतिसेवनाने देखील पोटफुगी किंवा आयबीएसचा त्रास वाढू शकतो. मात्र दही किंवा लुक्टोज फ्री दूधाचा आहारात वापर करू शकता. मात्र हा पर्याय निवडत असल्यास कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून योग्य सप्लिमेंट्सची निवड डॉक्टरांच्या सल्ल्याने करा.

आयबीएसचा त्रास टाळण्यासाठी ब्रेकफास्ट टाळू नका. तीन वेळेस भरपेट खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने खाण्याची सवय ठेवा.

 

आहारतज्ञ प्रेमा कोडिकल यांच्या सल्ल्यानुसार, आयबीएसचा त्रास कमी करण्यासाठी आहारात कशाचा समावेश करावा ?

सकाळी : ग्लासभर शहाळ्याचे पाणी / लिंबूपाणी / भाज्यांचा रस

ब्रेकफास्ट: 1 स्पाऊट डोसा /1 वाटीभर  कांद्याशिवाय केलेले पोहे

  • मिड मॉर्निंग: 1केळं
  • दुपारचे जेवण : 1 वाटी सलाड  (ब्रोकोली, कांदा शिवाय )+1 ब्राऊस राईस वाटीभर सोबतीला मूग डाळ + वाटीभर भाजी (फ्लॉवर, कोबी व्यतिरिक्त) + 1 वाटीभर दही  /1 ग्लास ताक  संध्याकाळचा नाश्ता : वाफावलेले कडधान्य/ चणा त्यावर चवीनुसार मीरपूड व मीठ
  • रात्रीचे जेवण : 1 वाटीभर सलाड /दूधीचे / भाज्यांचे सलाड +1ज्वारीची भाकरी + 1वाटीभर भाजी + 1 वाटीभर दही

यासोबतीने किमान आठ ग्लास पाणी नक्की प्या. शरीराला हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी लिंबूपाणी, शहाळ्याचे पाणी किंवा ताक यांचा आहारात नक्की समावेश करा.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>