केसातील कोंडा हा केसांप्रमाणेच तुमच्या त्वचेचही नुकसान करते. यामुळे चेहर्यावर, पाठीवर संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते. यावर उपाय म्हणून तुम्ही काही अॅन्टी-डॅन्डरफ शाम्पूचा वापर करत असाल पण काही वेळेस त्यातील घटकांचा शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. मग असा धोका पत्करण्यापेक्षा ‘सीताफळा’हा नैसर्गिक आणि घरगुती उपाय तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
- कसे आहे ‘सीताफळ’ फायदेशीर ?
सीताफळाच्या बीया आणि गर हे दोन्ही अॅन्टीफंगल, अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टीसेप्टिक असतात. त्यामुळे टाळूवरील संसर्ग कमी करून कोंड्याच्या समस्येवर मात करणे शक्य होते. तसेच याबरोबरीने खोबरेल तेलाचा वापर केल्यास टाळू व केसांचे आरोग्य सुधारते. ते अधिक हायड्रेटेड राहण्यास मदत होते. परिणामी कोंड्याचा त्रासही कमी होतो.
कसे वापराल सीताफळ ?
- तुमच्या केसांच्या उंचीप्रमाणे सीताफळाचा गर घेऊन त्याची पेस्ट करा.
- तवा गरम करून त्यात थोडेसे खोबरेल तेल गरम करून त्यात सीताफळाची पेस्ट घाला व सतत ढवळत रहा. मात्र तेल खूप गरम होणार नाही याची खात्री करा.
- तेलाचा रंग़ हलकाच बदलल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण वाटीत काढून ठेवा.
हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर टाळूवर लावा आणि तासाभराने केस स्वच्छ धुवा. हे मिश्रण लावताना केसांना हलकाच मसाजही करावा. यामुळे ते टाळूत नीट मुरेल. यासाठी तुम्ही गरम टॉवेलनेही केस घट्ट बांधून ठेवू शकता.
हा प्रयोग आठवड्यातून 2-3 वेळा करावा.
टीप : हा उपाय केस धुण्यापूर्वी काही वेळ करायचा असल्याने त्यातील तेलाचे प्रमाण तुम्ही ठरवू शकता. सीताफळाच्या सालीऐवजी तुम्ही बीयादेखील वापरू शकता मात्र त्या वाटताना थोडी काळजी घ्या.
Translated By - Dipali Nevarekar
Source – Sitaphal or custard apple — natural dandruff fighter
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.