Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बीटरूट –अ‍ॅनिमियावर मात करणारा नैसर्गिक उपाय !

$
0
0

शरीरातील हिमोग्लॉबिनचे प्रमाण कमी झाले तर कमकुवतपणा, दम लागणे, गर्भारपणात समस्या निर्माण  होणे अशा एक ना अनेक समस्या निर्माण होतात. मात्र आयर्नच्या कमतरतेमुळे जडणार्‍या अ‍ॅनिमियावर तुम्ही नैसर्गिक औषधांनी नक्कीच  मात  करू शकता. ‘बीट’ ही अशीच एक फळभाजी आहे ज्यामुळे तुमचं हिमोग्लॉबिन नैसर्गिकरित्याच वाढेल.  मग औषध बाजूला ठेवा आणि करून पहा हे उपाय !

का खावे बीटरूट ? 

  • शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करणार्‍या तसेच विविध अवयवांना ऑक्सिजन व  आवश्यक पोषणद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी आयर्न एक महत्त्वाचा घटक आहे.  ‘बीट’मध्ये आयर्नचा मुबलक साठा असल्याने रक्तनिर्मिती व रक्तपुरवठा सुधारतो.
  • रक्तशुद्धी व नैसर्गिकरित्या शरीर डीटॉक्स  करण्याची क्षमता ‘बीटा’मध्ये आहे.
  • बीटच्या पानांमध्ये  ‘व्हिटामिन ए’ तर  त्यांच्या मूळांमध्ये ‘व्हिटामिन सी’ मुबलक प्रमाणात आढळते. काहींमध्ये ‘व्हिटामिन ए’च्या कमतरतेमुळेदेखील अ‍ॅनिमिया जडतो.  तर ‘व्हिटामिन सी’च्या कमतरतेमुळे आयर्न शोषून घेण्याची क्षमता कमी होते.

म्हणूनच अ‍ॅनिमियावर मात करण्यासाठी  संपूर्ण ‘बीट’ उपयुक्त आहे.  मग पहा कसा कराल त्याचा तुमच्या आहारात समावेश

कच्चे बीट :

बीट  सोलून त्याचे लहान तुकडे करावेत  व कोशिंबीरीमध्ये मिसळून खावेत.  मात्र बीट  योग्यरित्या चावून खावेत. गिळू नका.  यासोबतच तुम्ही नियमित सकाळी कपभर बीट ज्यूस पिणेदेखील हितावह आहे. यामुळे अ‍ॅनिमियाचा धोका कमी होण्यास मदत होते.

वाफवलेले बीट :

जर तुम्हांला कच्चे बीट खायला आवडत नसेल तर ते वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या बीटाचे तुकडे करून त्यावर मीठ व लिंबू पिळावा. असा हा आरोग्यदायी नाश्ता दुपारच्या वेळेस खाल्ल्यास शरीरात रक्ताचे प्रमाण वाढायला मदत होते. बीट पचायला जड असल्याने तो वाफवून खाणे अधिक फायद्याचे आहे. त्यामुळे कोशिंबीर, पराठे,पॅटीस अशा नाश्त्याच्या पदार्थांमध्ये तुम्ही नक्कीच बीट वापरू शकता.

बीट ज्यूस :

नैसर्गिकरित्या अ‍ॅनिमियावर  मात करण्यासाठी ‘बीट’ हा अत्यंत फायदेशीर आहे. तसेच बीट हे नैसर्गिकरित्या गोड असल्याने अतिरिक्त साखर किंवा प्रिझरव्हेटिव मिसळण्याची गरज नाही.

2-3 मध्यम आकाराचे बीट घ्यावेत. त्यांना धुवून सोलून त्याच्या चकत्या करून घ्याव्यात. मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस बनवावा. चवीसाठी तुम्ही यामध्ये गाजर, सफरचंद अशा तुमच्या आवडीचे एखादे फळही मिसळू शकता.

Note:  बीट ज्यूस बनवताना त्यात स्वच्छ धुतलेली पानं व मूळंदेखील मिसळा. यामुळे तुम्हांला आवश्यक व्हिटामिन्सदेखिल मिळतील.

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Beetroot — the perfect home remedy to fight anaemia naturally

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>