Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पावसाळ्यात ‘शुष्क केस’असणार्‍यांनी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे !

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

पावसाळा हा अल्हाददायक ऋतू असला तरीही या दिवसांत आरोग्यासोबतच त्वचेची, केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. टाळूवर खाज येणे, केस तेलकट आणि अधिक रूक्ष होणे ही समस्या सर्रास आढळते. या समस्यांमुळे केस दर एक दिवसा आड धुणे गरजेचे होते. अन्यथा ते अधिकच शुष्क होतात. Mayophi च्या संस्थापिका आणि हेअरस्टायलिस्ट, ब्युटी एक्सपर्ट Mayophi Qinghai यांनी पावसाळ्यात शुष्क केसांच्या या समस्या आटोक्यात आणण्यासाठी दिलेल्या या काही टीप्स तुम्हांलाही निश्चितच फायदेशीर ठरतील.

  • तुम्हांला नियमित किंवा दर दिवसा आड केस धुण्याची इच्छा होत असली तरीही तसे करू नका. पावसाळ्यात केस आठवड्यातून दोनदा धुवावेत. यामुळे केसातील नैसर्गिक मॉईश्चरायझर टिकून राहण्यास मदत होते. तसेच शुष्कपणा कमी होतो.
  • मुळातच केस शुष्क असणार्‍यांनी, पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून किमान एकदा केसांना हेअर मास्क लावणे गरजेचे आहे. 15-20 मिनिटे घरगुती किंवा बाजारातील विकतचा हेअर मास्क लावल्यानंतर केस धुवा.
  • हेअर सेरममुळे केसांमधील मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे त्याचा वापर अवश्य करावा.
  • शक्यतो एकाच ब्रॅन्डचे हेअर प्रोडक्स वापरा. त्यामुळे शाम्पू, कंडीशनर, सेरम,स्प्रे एकाच ब्रॅन्डचे वापरा.
  • पावसाळ्यात केसांचा शुष्कपणा कमी करण्यासाठी पुरेसे प्रोटीन घटक आहारात ठेवा. यामुळे नैसर्गिकरित्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • केसांचे स्टाईलिंग करणारी उत्पादकं कमी वापरा. हेअर ड्रायरपेक्षा केस नैसर्गिकरित्या सुकवावेत. पावसाळ्याच्या दिवसात केमिकल ट्रिटमेंट घेणे टाळा. पावसाच्या पाण्यासोबत केमिकल रिअ‍ॅक्शन झाल्यास केसांचे आरोग्य अधिक बिघडू शकते. म्हणूनच केसांचा पोनीटेल किंवा घट्ट वेणी बांधा.

Image source: Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>