तरूणाईच्या गळातील ताईत आणि स्टाईलिश सुपरस्टार स्वप्नील जोशीच्या घरी काही महिन्यांपूर्वीच चिमुकल्या परीचं आगमन झाले आहे. आता नुकताच स्वप्नील जोशीने सोशल मिडीयावरून त्याच्या गोंडस मुलीचा एक फोटो शेअर करून तिचे नावही जाहीर केले आहे. स्वप्नील आणि लीना जोशीच्या या पहिल्या मुलीचे नाव ‘मायरा’ असे ठेवण्यात आले आहे.
‘मायरा’ या मुलीच्या नावाचा अर्थ होतो – Beloved म्हणजेच अतिशय जिवलग. स्वप्नील आणि लीना जोशीच्या आयुष्यातील ही नवी पाहुणी खरंच तिच्या नावाप्रमाणे ‘जीवलग’ /प्रिय व्यक्ती आहे. ( नक्की वाचा: नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड ! )
अवघ्या काही महिन्यांच्या ‘मायरा’ला तसेच स्वप्नील जोशी आणि कुटुंबीय यांना The HealthSite कडून खूप सार्या शुभेच्छा! तुमच्या घरातही ‘मायरा’प्रमाणे चिमुकले बाळ आले असल्यास त्या नवजात बाळाला भेटण्यापूर्वी या ’6′ गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.