Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मल्टीग्रेन एग रोल -चटपटीत हेल्दी रेसिपी

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock (Image for representational purpose only)

        मल्टीग्रेन  म्हटल्यावर तुमच्या मनात काय येते ? कदाचित ब्रेड किंवा सकाळच्या सिरल्सचा एखादा पदार्थ येत असेल. पण आज आम्ही तुमच्यासाठी नाश्त्याची हेल्दी टेस्टी ‘मल्टीग्रेन रेसिपी’ आणली आहे. मल्टीग्रेन एग रोल  हा आबालवृद्धांना आवडणारा एक पदार्थ आहे. यामधून शरीराल प्रोटीन, उत्तम दर्जाचे कार्बोहायड्रेट्स आणि पोषणद्रव्यांचा पुरवठा होतो. भूक लागल्यावर झटपट तयार होणारा हा मल्टीग्रेन एग रोल पोटभरीचा पर्याय आहे. चिंचेच्या किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही एग रोल्स खाऊ शकता.  पण बाजारात उपलब्ध असणारी गावठी की पांढरी अंडी खाणे अधिक फायदेशीर ?

  • साहित्य -:

बाहेरील आवरण -

गव्हाचे पीठ – पाव कप

ओट्सची पावडर  - पाव कप

आतील सारण -

  • अंडी -2
  • मध्यम आकाराची अर्धी चिरलेली भोपळी मिरची

मीरपूड – 1/2 टीस्पून

  • एक चिरलेली हिरवी मिरची
  • चवीपुरता मीठ
  • .2 टेबलस्पून तेल

कसा बनवाल मल्टीग्रेन एग रोल -

ओट्स आणि गव्हाचे पीठ एकत्र मिसळून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यावा.

त्याचे चार लहान गोळे करून चार पोळ्या लाटाव्यात.

त्यानंतर त्या तव्यावर भाजा.

सारण बनवण्यासाठी अंडी फोडून फेटून घ्यावीत.

त्यामध्ये सिमला मिरची, हिरवी मिरची, मीरपूड आणि मीठ मिसळा.

कढईमध्ये तेल गरम करून अंड आणि मिश्रण फोडणीला घालून बुर्जी बनवा.

मात्र ही बुर्जी फार कोरडी बनवू नका.

5-10 मिनिटांत गॅस बंद करून सारण पोळीमध्ये भरा.

किती आरोग्यदायी आहे ‘मल्टीग्रेन एग रोल्स’ :

एकाच पीठाच्या पोळ्या बनवण्याऐवजी आवडीनुसार 2-3 पीठं एकत्र करा.

अंड्यामधून शरीराला प्रोटीन आणि आवश्यक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात.

पीठं आणि अंड्यांमधून शरीराला प्रोटीन सोबतच आवश्यक डाएटरी फायबर्स मिळतात.  दररोज एक अंड खा आणि आरोग्याच्या समस्या दूर ठेवा !


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>