Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
पावसाळ्याच्या दिवसात साधा व्हायरल ताप ते डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया किंवा थकव्यामुळेदेखील ताप येतो. मग या तापाच्या प्रकारानुसार नेमके त्यामागील कारणांचे संकेत मिळवण्यासाठी Fortis Hospital चे डॉ. संदीप पाटील यांनी दिलेला सल्ला तुम्हांला नक्कीच मदत करेल. ताप, दातदुखी, डोकेदुखीच्या समस्यांमध्ये कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ? हे देखील नक्की जाणून घ्या.
1. व्हायरल फीव्हर -
निरोगी व्यक्तीचा व्हायरल फीव्हर असणार्या व्यक्तीशी संबंध आल्यास त्याला संसर्ग होऊ शकतो. याचाबरोबर दुषित पाणी, अन्न यामधूनदेखील व्हायरल फिव्हरची बाधा होते. तापासोबतच नाक गळणे, डोकं दुखणे, खोकला वाढणे अशा समस्या वाढतात. (नक्की वाचा : तापातून बाहेर पडण्याचे ’9′ घरगुती उपाय !)
2.डेंग्यू -
पावसाळ्याच्या दिवसात डेंगीची साथ सर्रास आढळते. यामध्ये अचानक ताप वाढणे, डोकेदुखी, डोळे दुखणे, त्वचेवर लाल रॅश दिसणे अशी लक्षण आढळतात. तापासोबत ही लक्षण वाढल्यास, 24 तासात वाढल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी. (नक्की वाचा : पपईच्या पानांचा रस ‘डेंग्यू’ रुग्णांसाठी फायदेशीर ! )
3.फ्लू –
फ्लूमध्ये तापासोबत थंडी वाजणे, नाक चोंदणे, घशात खवखव वाढणे, डोकेदुखी, थकवा अशी लक्षण आढळतात. फ्लू हे तापाचे सहज आढळणारे कारण आहे. 24 तासांपेक्षा अधिकवेळ ताप असल्यास डॉक्टरांकडे जा. असा सल्ला डॉ. पाटील देतात.
सर्वसामान्य तापाप्रमाणेच स्वाईन फ्लूदेखील आढळतो. याचा संसर्ग हवेच्या माध्यमातून झपाट्याने इतरांना होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी आणि इतरांनीदेखील विशेष काळजी घेनं आवश्यक आहे. स्वाइन फ्लू रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय नक्की आजमावून पहा.
5. मलेरिया -
मलेरियादेखील आजार आहे. यामध्ये तापासोबत थंडी वाजते. सोबतच मळमळणे, घाम येत असल्यास हे मलेरियाचे संकेत देतात.
6.टायफॉईड -
salmonella typhi नामक बॅक्टेरियामुळे टायफॉईड वाढतो. दुषित अन्न आणि पाण्यामधून टायफ़ॉईडचा प्रसार होतो. 104 फॅरेनाईट पर्यंत वाढणारा ताप, डोकेदुखी, डायरिया ही टायफ़ॉईडची लक्षण आहेत.
7. हेपेटायटीस -
कोणत्याही प्रकारच्या हेपेटायाटीसमध्ये सौम्य स्वरूपाचा ताप आढळतो. पण सोबतीला पोटदुखी किंवा मुत्राचा रंग बदलणे ही लक्षण आढळल्यास वेळीच चाचणी करून घेणे आवश्यक आहे. काविळीचा त्रास पुन्हा उलटू नये म्हणून या ’6′ गोष्टींची काळजी घ्या
8. सिझनल फ्लू -
वातावरणातील बदलामुळे सर्दी- खोकला, ताप येत असल्यास हा सिझनल फ्लू आहे. 2-3 दिवसात हा ताप ठीक होतो.
9.लो ग्रेड फीव्हर आणि हाय ग्रेड फीव्हर
लो ग्रेड म्हणजे सौम्य स्वरूपातील ताप तर हाय ग्रेड फीव्हर म्हणजे 103 फॅरेनाईडपेक्षा अधिक होणे. सौम्य स्वरूपातील तापामध्ये पॅरॅसिटॅमोलसारख्या गोळ्या घेऊ शकता. त्यामुळे तापावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. ताप तसाच राहिल्यास किंवा वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण या ’5′दुष्परिणामांपासून बचावण्यासाठी पॅरॅसिटॅमोल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका
10.इंफेक्शनमुळे येणारा ताप -
एखाद्या शस्त्रक्रियेनंतर किंवा वैद्यकीय उपचारांनंतर ताप येण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त पोटात, घशात संसर्ग झाल्यास ताप येऊ शकतो.