Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – ozee/ kahe diya pardes
बदलत्या ऋतूमानानुसार त्वचेची,केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीमुळे, हिवाळ्यात त्वचेच्या शुष्कतेमुळे तर पावसाळ्यात टाळूला खाज येणे, पायांना दुर्गंंधी येणे, त्वचेला खाज येण्याची समस्या वाढते. पावसाळ्यात डोक्याला खाज येण्याची समस्या अधिक तीव्रतेने जाणवण्यामागे सूर्यप्र्काशाभावी केसांमध्ये ओलसरपणा वाढतो. त्यामुळे फंगल वाढ अधिक होते. म्हणूनच La Roche-Posay and Vichy, Loreal India Pvt Ltd चे मेडीकल मॅनेजर डॉ.मिलन चॉस्की यांनी सांगितलेल्या या उपचारांनी टाळूमधील खाज कमी करा.
पावसाळयात डोक्याला खाज का येते ?
- कोंडा : केसात ओलसरपणा राहण्याचे प्रमाण वाढण्यास फंगसची वाढ होते. यामुळे केसात कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. त्यावर या उपायांनी मात करा. केसातील कोंड्याची समस्या दूर करणारे ’7′ घरगुती उपाय नक्की आजमावून पहा.
- Seborrheic dermatitis: टाळूवर अतिप्रमाण तेल निर्माण झाल्यास हा त्रास होतो. यामध्ये टाळूवरील त्वचा लालसर होणे, खाज सुटणे, कोंडा पडणे अशा समस्या दिसून येतात.
- पॅरॅसिटीक कंडीशन्स (Parasitic conditions) : यामध्ये केसात उवा, लिका होण्याचे प्रमाण वाढते. लहान मुलांप्रमाणेच प्रौढांमध्येही हा त्रास आढळतो. म्हणूनच इतरांची फणी,ब्रश वापरणे टाळा. यामुळे त्याचा प्रसार रोखण्यास मदत होते. केसांतील ऊवा घालवण्याचे 7 घरगुती उपाय
- अपुरा आहार : शरीराला पोषक आहार न मिळाल्यास, पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे डोक्याला खाज सुटते.
- केसांची पुरेशी काळजी न घेणे – केस विशिष्ट दिवसांच्या फरकांनी स्वच्छ धुणे आवश्यक आहे. तसेच केसांची काळजी घेतल्यास त्याचे आरोग्य आणि चमक राखण्यास मदत होते.
अॅपल सायडर व्हिनेगर – टाळूवरील खाज कमी करण्याचा नैसर्गिक उपाय !
घरगुती उपायांनी कशी कमी कराल टाळूवरील खाज ?
- खोबरेल तेलाने केसांना मसाज करा. काही वेळाने केस पाण्याने स्वच्छ धुवा.
- केसांना मधाला हेअर पॅक लावा. मधातील नैसर्गिक मॉईश्चरायझर आणि अॅन्टी मायक्रोबायल क्षमता केसांचे आरोग्य सुधारतात.
- बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण टाळूवर लावा. त्यानंतर काही वेळाने केस पाण्याने स्वच्छ धुवावेत.
- कोरफडीचा गर देखील टाळूवरील खाज कमी करण्यासाठी मदत करते.
- केस धुण्यासाठी योग्य शाम्पू आणि कंडीशनरचा वापर करा. दर आठवड्याला केसांंच्या पोतानुसार योग्य हेअर पॅक लावा.
- आहारात पुरेसे पाणी, फळं, हिरव्या भाज्या यांचा समावेश करा.