ead this in English
Translated By - Dipali Nevarekar
पीओएस म्हणजेच polycystic ovarian syndrome या स्त्रीयांमधील आजारामध्ये शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो. पीसीओएसमुळे मासिकपाळीच्या वेळेस त्रास होणे, गर्भधारणेमध्ये दोष निर्माण होणे, वजन वाढणे, अॅक्नेचा त्रास वाढणे अशा समस्या वाढतात. पीसिओएसचा त्रास असणार्यांमध्ये एन्ड्रोजन्स म्हणजेच पुरूषांचे हार्मोन्सचे प्रमाण वाढते. यामुळे लठ्ठ्पणा वाढतो. त्यावर मात करण्यासाठी वेळीच वैद्यकीय उपचारांची मदत घेणे आवश्यक आहे. मात्र यासोबतच काही नैसर्गिक उपायांनीदेखील पीसीओएसचा त्रास कमी होण्यास मदत होते. ‘अळशी’ या मसाल्याच्या पदार्थाने पीसीओएसवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. म्हणूनच PCOS च्या या ’7′ लक्षणांकडे दुर्लक्ष मूळीच करू नका !
- PCOS वर अळशी कशी ठरते फायदेशीर ?
अळशीमध्ये lignan नामक केमिकल घटक अधिक असतात. यासओबतच ओमेगा 3 फ़ॅटी अॅसिडचा देखील मुबलक साठा असतो. काही अभ्यासाच्या नुसार प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये, अळशीमधील lignan घटक अॅन्ड्रोजनची पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तसेच पीसीओएसचा त्रास असणार्या स्त्रियांना अळशी खायला दिल्यास त्यांच्यामधील अॅन्ड्रोजनची पातळीदेखील कमी होण्यास मदत होते.
30 ग्रॅम अळशी चार महिने आहारात घेतल्यास टेस्टेसटेरॉनच्या पातळीमध्ये फरक पडतो. तसेच लिपिड ( कोलेस्टेरॉल) च्या प्रमाणामध्ये फरक दिसऊन येतो. अॅन्ड्रोजन कमी झाले तरीही कोलेस्ट्रेरॉल आणि ट्रिग्लायसिराईडच्या पातळीमध्ये फरक दिसून येतो. या अभ्यासाच्या सोबतीने काही क्लिनिकल डाटादेखील आवश्यक आहे.
- PCOS त्रास कमी करण्यासाठी अळशीचा वापर सुरक्षित आहे का ?
अभ्यासानुसार, अॅन्टी अॅन्ड्रोजेनस , इन्सुलिन लोअरिंग घटक किंवा औषधांमुळे मासिकपाळीची अनियमितता, गॅस्ट्रोइंटेन्शिअल्स लक्षण वाढतात. मात्र अळशीच्या सेवनामुळे हे दुष्परिणाम कमी होतात. मात्र कोणताही नैसर्गिक उपाय निवडण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोलून सल्ला घेणे आवश्यक आहे. PCOD चा त्रास कमी करण्यासाठी आहारात ठेवा हे ’6′ पदार्थ
- कशाप्रकारे कराल आहारात अळशीचा वापर ?
अळशी थेट खाण्यापेक्षा इतर पदार्थांसोबत मिसळून खाणे अधिक फायदेशीर आहे. चमचाभर अळशी मिल्कशेक, आमटी कींवा सलाडवर भुरभूरा.यासोबतच सकाळच्या नाश्त्याला दह्यासोबत अळशी खाऊ शकता. मात्र त्याचे प्रमाण योग्य डॉक्टरांकडून घेणे आवश्यक आहे. कारण अळशीचे सेवनाचे हे दुष्परिणामदेखील आहेत.
Reference
Nowak, D. A., Snyder, D. C., Brown, A. J., & Demark-Wahnefried, W. (2007). The effect of flaxseed supplementation on hormonal levels associated with polycystic ovarian syndrome: A case study. Current topics in nutraceutical research, 5(4), 177.