अनेकांना वातावरणातील बदलांमुळे किंवा कमजोर झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे सर्दी- खोकला आणि तापाचा त्रास होतो. व्हायरल इंफेक्शनमुळे अनेकांची तब्येत बिघडते. अशावेळी कॉम्बिफ्लेम किंवा पॅरॅसिटॅमोल सारख्या गोळ्या घेऊन तात्पुरते उपचार करण्यापेक्षा तुळशी पानांचे सेवन करावे. या नैसर्गिक आणि सुरक्षित उपायाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते सोबतच ताण, डोकेदुखी, सायनसचा त्रास कमी होण्यासही मदत होते. म्हणूनच तुळशीच्या पानांचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या.
Journal of Ethnopharmacology [1] मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, तुळशीच्या पानांचे सेवन इम्यू सेल्सच्या निर्मीतीला चालना देण्यास मदत करतात. त्यामुळे संसर्ग वाढण्यास प्रतिबंध होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते. तुळशीच्या पानांमधीलअॅन्टीऑक्सिडंट आणि दाह शामक घटक सर्दी- खोकल्याच्या त्रासासोबतच शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
कशा प्रकारे कराल तुळशीच्या पानांचा उपयोग ?
1. तुळशीचा काढा : कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण 5-10 मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.
2.तुळस आणि दूध : तुळशीचं दूध तापावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. अर्धालीटर पाण्यामध्ये वेलचीची पावडर आणि तुळशीची पानं मिसळा. यामध्ये थोडं दूध आणि साखर मिसळा. हे दूध गरम प्यावे. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.
3. तुळशीचा रस : तापकमी करण्यासाठी तुळशीचा रसदेखील फायदेशीर ठरतो. लहान मुलांसाठीदेखील हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. 10-15 तुळशीच्या पानांना पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटावे. 2-3 तासांनी तुळशीचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.