Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Getty Images
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, घशातील खवखव अशा अनेक समस्या त्रासदायक ठरतात. त्यामुळे चिडचिड होणे, थकवा जाणवणे अशा समस्या वाढतात. यावेळेस झटपट तयार होणारा चवदार आणि हेल्दी पदार्थ म्हणजे चिकन सूप. पचायला हलके आणि पातळ सूप आजारपणामुळे आलेला थकवा कमी करण्यास मदत होते. ( नक्की वाचा : घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम !)
चोंदलेले नाक मोकळे होण्यास आणि सर्दी तापापासून सुटका मिळवण्यासाठी दोन कपभर सूप पिणे नक्कीच आरामदायी ठरू शकते. सूपामधील मसाले तुमचा त्रास कमी करतात. तर मीठामुळे घशातील खवखव वाढवणार्या बॅक्टेरियांचा त्रास कमी होतो. नक्की वाचा : या ’7′ आरोग्यदायी कारणांसाठी जरूर मारा ‘चिकन’वर ताव !
कसे बनवाल चिकन सूप -:
- चिकनचे बारीक तुकडे 100 ग्रॅम
- काळामिरी 4-5 दाणे
- एक दालचिनीचा तुकडा
- चिरलेले आलं
- 2-3 पाकळ्या लसूण
- 1-2 हिरव्या मिरच्या
- चिरलेली कोथिंबीर
- मीठ
- एक चिकन स्टॉक क्युब
कृती -
गॅस वर प्रेशर कूकरमध्ये चमचाभर तूप टाका. त्यावर आलं, लसूण, मिरची, गरम मसाले परता.
त्यानंतर त्यावर चिकनचे तुकडे घालून मिश्रण हलवा. हळूहळू चिकनचे तुकडे पारदर्शक होतील.
त्यामध्ये मीठ आणि कोथींबीर घालून मिश्रण एकत्र करा.
यानंतर चिकन स्टॉक आणि पाच कप पाणी मिसळा.
प्रेशर कुकरवर झाकण लावून मध्यम आचेवर पाच शिट्या करून चिकन शिजवा.
आवडीनुसार तुम्ही या सूपमध्ये कांदा, गाजर आणि इतर भाज्यादेखील मिसळू शकता. यामुळे सूप अधिक हेल्दी आणि चविष्ट होईल.