Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लोणच्याच्या अतिसेवनाने वाढतो या ’4′समस्यांचा धोका !

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –Getty Images

भारतीय जेवण हे चटकदार लोणच्याशिवाय अपूर्ण आहे. आंबट-गोड लोणचं हे भात, पोळी, भाकरी अगदी कशाच्याही सोबत अगदी सहज खाता येऊ शकते. नापसंतीच्या भाजीला लोणचं हा उत्तम पर्याय आहे. त्यामूळे तोंडाला चव येते. म्हणूनच त्याचे नकळत अतिप्र्माणात सेवन होऊ शकते. परिणामी काही समस्यांना आमंत्रण मिळते. म्हणूनच लोणच्याचा आहारात कितपत समावेश करावा हे जाणून घ्या.

का ठरते लोणचं त्रासदायक ?

  1. मीठाचे प्रमाण अधिक असते :

हृद्यरोगी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍या लोकांनी आहारातील मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. यामुळे सूज येणे, पाणी वाढण्याचा धोका वाढतो. रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मीठाच्या अतिसेवनाने रक्ताचे पाणी होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, दिवसभरात 5 ग्रॅम किंवा एक टीस्पून मीठ खावे. लोणच्यामध्ये मीठाचे प्रमाण हे अधिक असते. घरगुती लोणचं हे बाजारातील लोणच्यापेक्षा अधिक सुरक्षित असते. बाजारातील लोणच्यामध्ये ते अधिक काळ टिकवण्यासाठी काही केमिकल्स वापरले गेल्याची शक्यता अधिक असते. Sodium benzoate या केमिकलचा लोणच्यामध्ये समावेश केला असल्यास त्याच्या अतिसेवनाने कॅन्सरचा धोका वाढतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

2. अति तेल -

लोणचं बनवताना कैरी, लिंबू, मिरची तेलात बुडवून ठेवले जाते. यामुळे त्यावर बुरशी येत नाही. बॅक्टेरिया, फंगसपासून त्याचा बचाव होतो.परंतू अतिप्र्माणात लोणचे खाल्यास कोलेस्ट्रेरॉल वाढू शकते. त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. यामधून हृद्याचे, यकृताचे विकार वाढू शकतात.

3. गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका वाढतो – दक्षिण भारतात केलेल्या एका अभ्यासानुसार, सारख्याच डाएटरी पॅटर्नच्या लोकांमध्ये लोणच्याच्या फोडी खाल्ल्याने गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका वाढतो.

4. अन्ननलिकेला कर्करोग – लोणची अतिप्रमाणात खाल्ल्यास अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढतो. याबाबत ठोस अभ्यास नसला तरीही धोका टाळण्यासाठी लोणचं प्रमाणात खावे.

 


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>