Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Bindass Youtube channel
Read this in English
रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीला कंंटाळून आजकाल अनेकजण ओला, उबर यांंसारख्या प्रायव्हेट टॅक्सी सर्व्हिसला अधिक पसंती देत आहेत. गरजेनुसार वेळेत टॅक्सी उपलब्ध होत असल्याने अनेकांचा प्रवास सुकर झाला आहे. मात्र रात्री -अपरात्री किंवा सुनसान ठिकाणी प्रवास करताना तरूण आणि स्त्रियांनी काही गोष्टींची सुराक्षेच्यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. म्हाणूनच या ’10′ गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.
कॅबचे डिटेल्स घरातील / जवळच्या व्यक्तींना द्या -
कॅबचे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर वाहनाचा नंबर, प्रकार, ड्रायव्हरचे नाव आणि नंबर याचा एक मेसेज तुम्हांला येतो. सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती तुमच्या खात्रीच्या लोकांना द्या.
ओला शेअर -
ओला शेअर ही नवी सुविधा नुकतीच सुरू झाली आहे. एकाच दिशेला जाणारे प्रवासी कॅब शेअर करू शकतात. त्यामुळे तुमच्या सोबत प्रवास करणार्या प्रवाशांची माहिती घरातील व्यक्तींना द्या.
तुम्हांला ठाऊक असलेला रस्ता निवडा -
तुम्हांला विनाकारण फिरवू नये तसेच तुमची फसवणूक होऊ नये म्हणून प्रवासादरम्यानच्या रस्त्याची माहिती आधीच घ्यावी. त्यानुसार कोणता रस्ता टाळावा, कुठे वळण घ्यावे हे तुम्ही ड्रायाव्हरला सांगा. तुम्हांला रस्ता माहित नसल्यास आजुबाजूचा परिरस पहा. एखादे लॅन्डमार्क लक्षात ठेवा.
सतत जवळच्या व्यक्तीशी बोला -
लांबचा प्रवास असल्यास सतत जवळच्या एखाद्या व्यक्तीशी बोला. तुम्ही कुठपर्यंत पोहचलात. अजून किती वेळ लागेल याची माहिती द्या.
वैयक्तिक माहिती देऊ नका -
प्रवासादरम्यान तुम्ही जवळच्या व्यक्तीशी बोलताना स्वतःबद्दलची माहिती देऊ नका. अति मोठ्याने किंवा प्रायव्हेट संभाषण टाळा. तसेच ड्रायव्हरला तुमची भाषा किंवा इंग्रजी समजत नसेल अशा भ्रमात राहू नका.
स्व बचाव -
एखाद्या वाईट प्रसंगी स्वतःचा बचाव करण्याची वेळ आल्यास छत्री सोबतच पेपर स्प्रे ठेवा. पेपर स्प्रे तुम्ही घरीदेखील बनवू शकता. पाण्यामध्ये मिरपूड मिसळूम स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्याऐवजी तुम्ही बॉडीस्प्रेचादेखील वापर करू शकता.
झोपू नका -
शक्यतो एकटे प्रवास करताना झोपू नका. रात्रीच्या वेळेस प्रामुख्याने असे केल्यास तुम्हांला चूकीच्या स्थळी, चूकीच्या रस्त्याने नेण्याचा धोका असतो. त्यातून काही धोकादायक प्रसंग उद्भवू शकतात.
लांब दांड्याची छत्री जवळ ठेवा -
पावसाळ्याच्या दिवसामध्ये सखल भागामध्ये पाणी साचण्याची समस्या सर्रास आढळते. अशावेळी तुम्ही ट्राफिकमध्ये अडकण्याचा धोका अधिक असतो. अनेकदा गाडी लॉक होते. तेव्हा बाहेर पडण्यासाठी गाडीच्या काचा फोडण्यासाठी छत्री फायदेशीर ठरते. यासोबतच आत्मसंरक्षणासाठी देखील छत्री उत्तम पर्याय आहे.
मद्यपानानंतर एकट्याने प्रवास टाळा -
विकेन्डला मद्यपान केल्यानंतर नशेत एकट्याने प्रवास करणे टाळा. अशावेळी तुमच्या सोबतीला एखादी व्यक्ती ठेवा. अन्यथा तुमची फसवणूक किंवा लज्जास्पाद स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते.