Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

केवळ चमचाभर तेलात बनवा चवदार ‘फिश बिर्याणी’ !

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –Shutterstock

Read this in English

चिकन किंवा मटण बिर्याणी जितकी जीभेला चविष्ट तितकीच कॅलरीज आणि फॅट्सने युक्त असल्याने त्याच्यावर ताव मारल्यास वजन आणि फ़ीटनेसचं गणित डगमगू शकते. मात्रा एखाद्या चीट डे दिवशी  बिर्याणीला थोडा हेल्दी ट्विस्ट देऊन तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता. चिकन, मटणऐवजी माशांच्या तुकड्यांचा त्यामध्ये वापर करून बिर्याणी अधिक चवदार बनवता येऊ शकते. मग पहा सेलिब्रिटी शेफ़ संजीव कपूर यांनी सुचवलेली ही खास ‘फिश बिर्याणी’. ( नक्की वाचा : आठवड्यातून दोनदा मासे खा आणि हेल्दी रहा ! )

माशांमधून शरीराला प्रोटीन आणि ओमेगा फ़ॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो. यामुळे हाडांची बळकटी वाढते, हृद्यविकारांचा धोका कमी होतो. मग केवळ एक टेबलस्पून तेलात तयार होणार्‍या या बिर्याणीचे साहित्य आणि कृती तुम्ही नक्की जाणून घ्या. आणि टेस्टी मांसाहार हेल्दी बनवण्यासाठी या ’6′ चूका टाळा

साहित्य :

  • 400 g माशांचे तुकडे
  • 2 कप शिजवलेला भात
  • 1 कप दही
  • 1/4 tsp जिरं
  • 1 tsp हळद
  • 1 tsp तिखट
  • 1 tbsp धनेपूड
  • 1/4 tsp गरम मसाला
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 1 tbsp लसूण पेस्ट
  • 1 tbsp आलं पेस्ट
  • 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
  • 1/4 कप तळलेला कांदा
  • 20 पुदीन्याची पानं
  • 2 tbsp चिरलेली कोथिंबीर
  • 1 tbsp लिंबाचा रस
  • 1 tbspतेल
  • चवीपुरता मीठ

कृती :

नॉनस्टिकच्या कढईमध्ये  माशांचे तुकडे घालून त्यावर दही, मसाले, आलं लसून पेस्ट, चिरलेला आणि तळलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालून मिश्रण नीट एकजीव करून त्यावर लिंबू पिळा. या मिश्रणाचा एक लेअर तयार करा. त्यावर शिजवलेल्या भाताचा लेअर पसरवा. भातावर थोडेसे दही आणि मीठ पसरा. पुन्हा त्यावर मसाले, पुदीन्याची पानं आणि थोडेसे तेल पसरा.

यावर झाकण घालून बिर्याणी मोठ्या पाच आचेवर मिनिटं आणि मंद आचेवर दहा मिनिटे शिजवा. याप्रमाणेच रमजान हेल्दी रेसिपी: लखनवी मटण बिर्याणीचाही आस्वाद घेण्यासाठी पहा ही रेसिपी .

वजन सांभाळून मटण, मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी डाएट प्लान मांसाहारींसाठी खास !


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>