Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock
Read this in English
केवळ मुलींनीच केसांची काळजी घ्यावी हा नियम नाही. मुलांनाही नियमित केसांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे केस तुलनेत कमी असतात. परंतू त्याची काळजी कशी घ्यावी हे हेअर अॅन्ड ब्युटी एक्सपर्ट जनेत फर्नांडीस यांच्याकडून जाणून घ्या नक्की
1. गरम पाण्याने केस धुणे टाळा -
गरम पाण्याचा वापर केसांवर करू नका. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल आणि चमक निघून जाते. केस धुताना कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.
2. डोक्यावर टॉवेल घासू नका -
केस धुतल्यानंतर डोकं टॉवेलने घासू नका. तुमच्या या सवयीमुळे केसांचे नुकसान होते. त्याऐवजी डोकं टॉवेलने पुसून हातांच्या बोटांनी अतिरिक्त पाणी काढा. यामुळे केसातून पाणी काढायला वेळ लागत असला तरीही तो नक्की द्या.
3. केस नियमित ट्रीम करा -
केस विशिष्ट अंतराने / दिवसांनी ट्रीम करा. यामुळे ते उत्तम राहतात. यामुळे केस वाढायला मदत होते. दर 4-5 आठवड्यांनी केस थोडे ट्रीम करा.
4. ओल्या केसांवर ब्रश फिरवू नका -
ओले केस विंचरू नका. केस विंचरताना लांब दाताची फणी वापरा.
5. नियमित केस धुवा-
केसांचे आरोग्य जपण्यासाठी ते नियमित स्वच्छ धुवा. दर एक आड एक दिवस केस धुणे फायदेशीर आहे. तुमच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य शाम्पू निवडा. तुमचे केस शुष्क असतील तर शाम्पू वापरणे टाळा त्याऐवजी मॉईश्चराईजिंग कंडीशनर वापरा.