Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

संगीताची जादू दूर करते या ’5′समस्या !

$
0
0

21 जून – आंतरराष्ट्रीय संगीत दिन  !  

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –Shutterstock

संगीत तुमच्यावरील मानसिक आणि शारिरीक ताण कमी करण्यास मदत करण्यास मदत करतात. तुमच्यावरील ताण कमी झाल्याने प्रोडक्टटीव्हिटी सुधारते. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते तसेच अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होण्यास मदत होते. मग पहा तुमच्या आवडीचे संगीत ऐकण्याचे हे काही आरोग्यदायी फायदे !

वजन कमी होते :

femalefirst.co.uk  च्या  अहवालानुसार, ब्रुनेल युनिव्हरसिटी -लंडन येथील स्पोर्ट  सायकोलॉकिस्टच्या नुसार  संगीत ऐकल्याने  व्यायाम करण्याची क्षमता आणि त्यामधून मिळणारे  निकाल सुधारण्यास मदत होते.  व्यायामआणि संगीताची लय  एकमेकांशी जुळणे आवश्यक आहे. यामुळे अधिक सकारात्मक परिणाम मिळण्यास मदत होते. वेट ट्रेनिंग़, जॉगिंग़, सायकलिंग यावेळी नक्कीच संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा. सोबतच वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे !

मनः शांती मिळण्यास मदत होते :

शरीरामध्ये सात चक्र असतात. त्यामध्ये बिघाड झाल्यास आजारपण वाढते. चक्राची सुरवात डोक्यापासून मानेच्या मणक्यापर्यंत असते.  तुमच्या मानसिक भावनांमध्ये चढ -उतार झाल्यास चक्रांवरही त्याचा परिणाम होतो. परिणामी रोग जडायला सुरवात होते. एलिसिया या  सायकोथेरपिस्ट, स्ट्रेस मॅनेजमेंंट ट्रेनरच्या मते, संगीतामुळे शरीरातील सातही चक्रांंमध्ये सुसंगती निर्माण करण्यास मदत होते. परिणामी अनेक समस्यांना मूळापासून दूर ठेवण्यास मदत होते. जाणून घ्या छातीपाशी असलेल्या अनाहत चक्राचे आणि नमस्कार करण्यामागील आरोग्यदायी कनेक्शन !

न्युरोलॉजिकल समस्यांना आटोक्यात ठेवण्यास मदत होते : 

इंडियन मेडीकल असोसिएशनचे न्युरो फिजिशियन डॉ. जे एस काथपाल यांच्या मते,  नैराश्य, निद्रानाश , भीती अशा अनेक मानसिक ताणतणावाच्या न्युरॉलॉजिकल समस्यांमध्ये संगीत ही प्रभावी उपचार पद्धती ठरते. यामुळे मेंदूचे कार्य सुधारते तसेच आनंदी ठेवणारे एन्डॉरफिन हार्मोन्सचा प्रवाह सुधारतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हिप हॉप संंगीत प्रकार मेंंदूच्या कार्याला चालना देतात.स्क्रिझोफेनिया, डीप्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी संगीत निश्चितच फायदेशीर ठरते असा सल्ला केम्ब्रिज युनिव्हरसिटीचा अहवाल सांगतो.

ऑर्गॅझम सुधारते :

सेक्सचा आनंद वाढवण्यासाठी संगीत नक्कीच फायदेशीर ठरते. व्हेसलेयन युनिव्हरसिटी च्या अहवालानुसार,संगीताची जादू ऑरगॅझमचा आनंद वाढवण्यासाठीदेखील होतो.  संगीतामुळे शरीरात विशिष्ट प्रकारची झिंग़ निर्माण होते. स्किन ऑर्गॅझमचा अनुभव येतो. यामुळे तुम्ही उत्तेजित होण्यास मदत होते. त्यामुळे सेक्स करण्याच्या रात्री एखादे रोमॅन्टीक किंवा वेस्टर्न क्लासिकल संगीत लावून ठेवा.

शांत झोप मिळते :

जर्नल ऑफ एडवान्स नर्सिंगमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार शास्त्रीय संगीत हा निद्रानाशेवरील एक सहज, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. रात्री पुरेशी आणि शांंत झोप न मिळाल्यास दिवसा थकवा, सुस्ती येण्याचे वाढते. नैराश्याचे प्रमाण वाढते. संगीत ऐकल्याने नसा आणि स्नायूदेखील शांत होण्यास मदत होते. तसेच मनाची अस्वस्थता , शरीरातील रक्तदाब , श्वसनाची गती सुधारते. यामुळे शांत  झोप येण्यास मदत होते. रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !


 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles