Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हाताची बोटं मोडणं ही सवय आरोग्यदायी आहे का ?

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –Shutterstock

अनेकांना काहीनाकाही विचित्र सवयी असतात. कंटाळा आला किंवा फावल्या वेळात हाताची बोट मोडण्याची सवय अनेकांना असते. पण ही सवय केल्याने खरंच फायदेशीर असतो की त्यामुळे हाडांचे नुकसान होते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? मग पहा ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. समर्जित चक्रबर्ती यांनी दिलेला हा सल्ला नक्की वाचा.

  • अनेकांना वाटते की बोटं मोडण सवय चूकीची आहे. हे योग्य आहे  का ?

बोटं मोडणं ही सवय चूकीची नाही तसेच बरोबरही नाही. बोटं मोडताना त्यामधून येणार्‍या आवाजासोबत सांध्यांचे दुखणे, ताप अशी लक्षण आढळत नाही तो पर्यंत ठीक आहे. नक्की वाचा : साधे सांध्यांचे दुखणे अर्थ्राईटीसच्या त्रासापासून या ’6′ लक्षणांनी वेगळे ठरते 

काही अभ्यासाच्या अहवालानुसार, बोट मोडल्याने हाडांची हालचाल सुधारते. त्यामुळे बोटं मोडण्याची सवय असली तरीही त्याबरोबर त्रास  होत नसल्यास ही सवय त्रासदायक नाही.

  • बोटं मोडल्यानंतर आरामदायी का वाटते ?

बोटं मोडताना ती सांध्यांमध्ये वाकवली जातात. यामुळे स्नायूंवरील ताण काहीप्रमाणात  कमी होतो. परिणामी काहींना थकवा किंवा मरगळ आल्यास हाताची बोटं मोडण्याची सवय असते.  नक्की वाचा : ‘मसाज’ करणे सांध्यांच्या दुखण्यावर का ठरत नाही फायदेशीर ?

  • बोटं मोडताना आवाज येणे हे कमजोर हाडांचे लक्षण आहे का ?

बोटं मोडताना येणारा आवाज आणि सांध्यांचे  विकार यांचा एकमेकांशी थेट संबंध नाही. तसेच यामुळे हाडं कमजोर होण्याचा धोकादेखील नसतो.

  • यामुळे पकड किंवा हाडांच्या शेपवर / आकारावर परिणाम होतो  का ?

नाही. हाताची, पायाची बोटं मोडणं यामुळे त्यांच्या आकारावर कोणताही परिणाम दिसून येत नाही.

  • या सवयीमध्ये अनुवंशिकता हे कारण असू शकते का ?

खरं तर नाही. कोणालाही सहज बोटं मोडण्याची सवय असू शकते. मात्र काही दुखणी अनुवंशिक असू शकतात. पण बोटं मोडण्याची सवय त्यामुळे जडते यामध्ये काही तथ्य नाही.

  • काही जण मुद्दामून हाडांचा आवाज करण्याचा प्रयत्न करतात हे योग्य आहे का ? त्यामुळे त्रास होतो का ?

सहाजिकच नाही. बोटं मोडल्यानंतर अत्यंत आरामदायी वाटते. मात्र सांधेदुखीचा त्रास किंवा वेदना होत असल्यास बोटं मोडू नका.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>