Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Ria Salian
वजन कमी करण्यासाठी जिम, डाएट यासारखे अनेक पर्याय वापरले जातात. मात्र या प्रयत्नांसोबतच प्रबळ इच्छाशक्ती आणि आरोग्यदायी सवयींचादेखील अवलंब करणे गरजेचे आहे. आहार आणि व्यायामाचा हा समतोल तुम्हांला सांभाळता आला तर वजन घटवणे आणि ते आटोक्यात ठेवणेदेखील सुकर होते. रिया सॅलियन हीनेदेखील केवळ सूर्यनमस्कार करून तब्बल 31 किलो वजन घटवले आहे.
रिया बारावीत शिकत असताना तिचे वजन सुमारे 86 किलो होते. आरशात पाहिल्यानंतर तिला स्वतःचाच राग येत असे. घरातील व्यक्ती, नातेवाईक, शाळेत सारेच माझी थट्टाटा करत असे असे रियाचे म्हणणे आहे. तिच्या अतिलठ्ठपणामुळे कपड्यांची निवड करणे अत्यंत किचकट काम होत असे. आवडीचे कपडे साईझमध्ये बसत नसल्याने अनेकदा आवडीनिवडींवर पाणी सोडावे लागत असे. त्यामुळे अनेकदा स्वतःच्या वजनामुळे मनाचे खच्चीकरण होत असे. बाहेर फिरताना ओठांवर हास्य मात्र मनात खूप न्युनगंड असल्याची भावना रियाने बोलून दाखवली आहे.
कसा होता ‘वेट लॉस’चा प्रवास !
लठ्ठपणा असला तरीही रियाने फीटनेसकडे पूर्वी फार काळ लक्ष दिले नव्हते. मात्र हळूहळू ते गरजेचे आहे हे रियाच्या लक्षात आले. बारावीच्या परिक्षेनंतर स्वतःकडे अधिक लक्ष देणे हा रियाने स्वतःचा प्राधान्यक्रम असला पाहिजे हे ठरविले. योगाभ्यास ही प्राचीन विद्या असली तरीही एक मजेशीर व्यायाम प्रकार असल्याने त्याकडे ती अधिक आकर्षित झाली. काही महिन्यातच योगाभ्यास करून रियाने पाच किलो वजन कमी केले. इथूनच योगाच्या मदतीने वजन घटवण्याच्या प्रवासाला सुरवात झाली. योगा सोबतच वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे !
- व्यायामाचे रूटीन कसे होते ?
झिरो फिगरचे वेड लावणार्या करिना कपूरनेदेखील सूर्यनमस्काराच्या मदतीने ही किमया साधली होती. सोबतच बिपाशा बासूदेखील नियमित 108 वेळा सूर्यनमस्कार करते. या अभिनेत्रींच्या फिटानेस फंड्यांचे धडे रियानेदेखील गिरवले होते. रिया तासभर सूर्यनमस्कार करते. तासाभरात सुमारे 100 सूर्यनमस्कार करणे शक्य होते. सूर्यनमस्कार हा एक उत्तम कार्डीयो व्यायाम आहे. यामुळे कॅलरीज बर्न होणे शक्य होते. यासोबतच रिया चालण्याचा आणि ब्रिस्क वॉकिंगचा व्यायामदेखील करणे फायदेशीर ठरले. त्यामुळे तीन तासांचा व्यायाम तिला फॅट टू फॅब बनवायला फायद्याचा ठरला. व्हिडीयो : योगा – वजन घटवण्याचा राजमार्ग
- रियाचे डाएट
वजन घटवण्यासाठी रियाने कोणत्याही प्रकाराचे क्रॅश डाएट कोर्स केले नाहीत. परंतू जंकफूड पूर्णपणे टाळून केवळ घरगुती जेवणावर अधिक भर दिला. सोबतच गोडाचे पदार्थ पूर्णपणे कमी करून विशिष्ट अंतराने पाणी पिण्याची सवय स्वतःला लावून घेतली.
- न्यूनगंड कमी करून कशी बनली रिया आत्मविश्वासू
रियाचे वजन दोन वर्षामध्ये तब्बल 86 किलोवरून अवघ्या 55 किलोवर आले. योगाअभ्यास आणि खाण्याच्या सवयींवर नियंट्रण मिळवल्याने रियाचे 31 किलो वजन कमी झाले आहे. घटवलेले वजन आटोक्यात ठेवण्यासाठी रिया नियमित योगाभ्यास करते. रियाच्या मते, ‘वजन घटवण्यासाठी तुम्हांला काय करणे शक्य आहे ते आवडीनुसार निवडा आणि नियमित त्याचा अभ्यास करा.’
वजन घटवण्यासाठी नियमित प्रयत्न करणे गरजेचे आहे. एका रात्रीमध्ये बदल होणार नाही. रियाचे प्रयत्न तुम्हांला प्रेरणा देत असतील तर आजपासून योगाभ्यासाला सुरवात करा. वजन कमी करण्यासाठी ही योगासनं फायदेशीर ठरतात.