Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

रक्तदानाबाबत हे ’10′गैरसमज आजच दूर करा !

$
0
0

14 जून – विश्व रक्तदान दिवस 

Read this in English 

 Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हटले जाते. पण ही उक्ती केवळ कागदावर राहते. रक्तदानाबाबत काहींना उत्सुकता असते परंतू त्याभोवती असलेले गैरसमज आणि भीती यामुळे अनेकजण त्यापासून दूर राहतात. म्हणूनच तुमच्या मनातून रक्तदानाबाबतचे हे काही गैरसमज दूर करा आणि रक्तदानासाठी एक पाऊल पुढे या.

गैरसमज 1: रक्तदान करताना त्रास होतो

सत्य : रक्तदानाच्या दरम्यान सूईचा वापर केला जातो. ती हातावर टोचली जाते मात्र हा त्रास क्षणिक असतो.

गैरसमज 2: रक्तदानानंतर आरोग्य बिघडते, थकवा येतो.

सत्य : यामध्ये तथ्य नाही. उलट एका संशोधनानुसार, रक्तदान केल्यानंतर कार्डियोव्हसक्युलर आजारांचा धोका कमी होतो. शरीरात अतिरिक्य आयर्न साचून राहण्याचा धोका कमी होतो. रक्तदानापूर्वी दात्याची चाचणी केली जाते. ज्यामधून वैद्यकीय धोके, हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते. दात्याचे हिमोग्लोबिन 12.5 ग्रॅम परसेंटपेक्षा कमी असेल किंवा अन्य व्याधींचे निदान झाल्यास तुम्ही रक्तदान  करण्यास  पात्र ठरणार नाहीत.

गैरसमज 3:  रक्तदानानंतर शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते.

सत्य : रक्तदान केल्याने शरीरात मूळीच त्याची कमतरता निर्माण होत नाही. रक्तदानानंतर 48 तासांत ती झीज भरून निघते. तुमचे आरोग्य उत्तम असल्यास आणि संतुलित आहार  घेणार्‍या  व्यक्ती दर तीन महिन्यातून एकदा म्हणजेच वर्षातून चार वेळेस रक्तदान करू शकतात.

गैरसमज 4: माझा रक्तगट विशेष नाही. त्यामुळे माझ्या रक्तदानामुळे फारशी मदत होईल असे मला वाटत नाही.

सत्य : सतत शस्त्रक्रिया, अपघातानंतरच्या उपचारामध्ये रक्ताची गरज भासते. त्यामुळे विशेष रक्तागटासोबतच सामान्य रक्तगटाचीदेखील गरज सातत्याने भासते.

गैरसमज 5 : रक्तदानानंतर दिवसभर आराम करणे गरजेचे आहे.

सत्य : रक्तदानानंतर  काही वेळातच तुम्हांला पुन्हा काम  करण्याची मुभा दिली जाते. मात्र त्यासाठी खालील काळजी घेणे आवश्यक आहे.

रक्तदानानंतर 24 तासामध्ये किमान 10-12 ग्लास पाणी किंवा इतर द्रव्यपदार्थ घ्यावेत.

रक्तदानानंतर 2-3 दिवस  मद्यपान टाळा.

रक्तदानानंतर 3-4 तास वाहन चालवणं,फार काळ उन्हांत राहणे, धुम्रपान करणे टाळा.

गैरसमज 6: रक्तदानानंतर लठ्ठपणा वाढतो.  

सत्य : रक्तदानाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होत नाही. त्यामुळे वजन वाढत नाही. प्रमाणापेक्षा अधिक खाऊन व्यायाम न केल्यास वजन वाढू शकते.

गैरसमज 7 : मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे मी रक्तदान करू शकत नाही.   

सत्य : रक्तदानाच्या वेळेस तुमचा रक्तदाब 180 systolic ते  100 diastolic पेक्षा कमी असल्यास तुम्हांला ती संधी दिली जाते. तुम्ही रक्तदाबावर घेत असलेल्या गोळ्यांवर काहीवेळेस हे अवलंबून असते.

गैरसमज 8:  मला मधूमेहाचा त्रास असल्यास मी रक्तदान करू शकत नाही.

सत्य : डॉक्टरांच्या मते, मधूमेहीदेखील रक्तदान करू शकतात. परंतू रक्तदानाच्या वेळेस तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणामध्ये असणे आवश्यक आहे. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !

गैरसमज 9:  रक्तदान करण्याइतका मी तरूण नाही.

सत्य : रक्तदान करण्यासाठी किमान वयाचे बंधन असले तरीही कमाल वयाचे काहीच बंधन नाही. तुमचे आरोग्य उत्तम असल्यास तुम्हांला रक्तदान करण्याची परवानगी आहे.

गैरसमज 10:  रक्तदानामुळे एचआयव्हीचा धोका वाढतो.

सत्य :  रक्तदानादरम्यान स्टरलाईझ केलेल्या सुया वापरल्यास रक्तातून पसरणार्‍या इंफेक्शनचा धोका नक्कीच कमी होतो. आजकाल एकच सूई परत वापरली जात नाही. त्यामुळे निश्चितच हा धोका कमी आहे.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>