Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
प्रेमात पडल्यावर सुरवातीला सारेच गोड – गुलाबी असते. कधी प्रेम तर कधी खटके, वाद विवाद यांमधून रिलेशनशिप खुलत जाते. रिलेशनशिपमधून नात्यामध्ये अडकताना मुलींना अनेक गोष्टींची खात्री करू घेणे आवश्यक वाटते. दुर्देवाने काही मुलींची नात्यामध्ये फसवणूक होते. म्हणूनच ती वेळीच टाळण्यासाठी आणि त्यातून होणारा त्रास कमी करण्यासाठी या ’7′ लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
1. तुमची ओळख त्याच्या घरातील सदस्यांशी / मित्रांशी करून देण्यात टाळाटाळ करणे
तुमच्या बॉयफ्रेंडला भावी आयुष्य तुमच्यासोबत घालवायचे असल्यास तो तुमची ओळख त्याच्या घरातील व्यक्ती, मित्रमैत्रिणींशी करून देण्यात उत्सुक असतात. मात्र तो ही गोष्ट टाळत असल्यास तुमचे रिलेशनशीप पुढे नेण्यास तो फारसा उत्सुक नसल्याचे स्पष्ट होते.
2. तुम्ही सोशल मिडीयावर तुमच्या संबंधांबाबत स्पष्टपणे काहीच न लिहणे
तुम्ही वर्षभर एकत्र रिलेशनशीपमध्ये राहूनदेखील तुमच्या नात्याबाबत काहीच न लिहणे, फोटो न टाकणे. हे थोडे विचित्र आहे. तुमच्या सोबत त्याला आयुष्य काढण्याबाबत उत्सुकता असल्यास किमान जवळच्या लोकांना दाखवण्यासाठी एकत्र फोटो क्लिक करण्याबाबत त्याच्या मनात उत्सुकता असणे आवश्यक आहे.
3. तुमच्यासोबत भावी आयुष्याचे एकत्र प्लॅनिंग न करणे
तुम्ही त्याच्याशी भावी आयुष्याबाबत चर्चा केल्यास तो विषय केवळ तात्पुरता बोलला जात असल्यास तुमच्या नात्याबाबत विचार करा. लग्नासारख्या महत्त्वाच्या टप्प्याचा विचार करताना एकमेकांशी त्याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे.
4. तुमच्यासोबत ‘डेट’ वर जाण्यास टाळाटाळ करणे
एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर एकमेकांसोबत भटकणे, वेळ घालवणे हे अगदीच सामान्य आहे. मात्र तसे होत नसल्यास, तुमच्यासोबत वेळ घालवण्यास वारंवार टाळाटाळ करत असल्यास त्याबाबत विचार करणे आवश्यक आहे.
5. कमिटमेंटची भीती वाटणं -
कोणाच्या लग्न किंवा साखरपुड्याच्या कार्यक्रमात गेल्यानंतर तुम्हा दोघांच्या आयुष्यातल्या लग्नाचा निर्णयाबाबत भीती वाटत राहणे. किंवा त्या पासून दूर पळणे हे लक्षण थोडे चिंता निर्माण करणारे ठरू शकते.
6. तुमचे बोलणे, सल्ला ऐकून न घेणे
जर तुमचा साथीदार तुमचा, तुमच्या विचारांचा आदर करत असेल तर नक्कीच एखाद्या गोष्टीवर तुमचे म्हणणे काय असेल किंबहुना आहे. याबाबत विचार करेल. तुमच्याकडून सल्ला जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवेल. मात्र तसे होत नसल्यास तुमच्या मतांचा विचार केलाच जात नसल्यास त्याच्या आयुष्यातील तुमचे स्थान विचार करायला लावणारे आहे.