Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
सकाळी व्यायाम करण्यासाठी तुम्ही उत्साही असणे गरजेचे आहे. व्यायामापूर्वी खाल्याने त्रास होण्याची शक्यता असते तसेच रिकाम्या पोटी व्यायाम करणेदेखील चूकीचे आहे. व्यायामातून कॅलरीज बर्न करण्यासाठी शरीरात शक्ती असणे गरजेचे आहे. त्यासाठी नेमके काय करावे? तुमचा डाएट कसा असावा हे जाणून घेण्यासाठी फ़ीटनेस एक्सपर्ट रोशनी शहा यांच्या खास टीप्स नक्की जाणून घ्या.
- धावण्यापूर्वी तासभर काय खावे ?
ग्लासभर पाणी : आहारासोबतच शरीराला मुबलक पाण्याचीदेखील गरज असते. डीहायड्रेशनचा त्रास वाढल्यास मेटॅबॉलिझमचा त्रासदेखील अधिक वाढण्याची गरज आहे. त्यामुळे व्यायामासोबतच त्याआधीदेखील पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर किमान ग्लासभर गरम पाणी प्यावे.
बेदाणे आणि बदाम खावेत -
धावण्याचा व्यायाम करताना कार्बोहायड्रेटसवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुले धावण्यापूर्वी मूठभर बेदाणे आणि बदाम खावेत. यामुळे तुम्हांला प्रसन्न वाटायला मदत होईल. यामुळे मसल्सना दुखापत होण्याचा त्रास कमी होतो.
- धावण्यापूर्वी अर्धा तास आधी काय खाल ?
लहानसे केळे -
धावण्यापूर्वी 20-30 मिनिटे आधी हलका आणि पचायला सोपा नाश्ता करावा. ज्यामुळे व्यायाम करण्यासाठी उर्जा मि ळते सो बतच पचनातही अडथळे निर्माण करत नाही. लहानसे केळे किंवा 2-3 हलकी फुलकी बिस्कि टं तुम्ही खा ऊ शकता.
धावण्यापूर्वी काय खाणे टाळाल ?
- धावण्या पूर्वी भरपूर प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, एनर्जी बार खाणे टाळा.
- धावण्यापूर्वी दूग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. ग्लासभर दूध पि ऊन उर्जा मिळत असली तरीही त्यामुळे पोटात बिघाड होऊ शकतात. दुग्धजन्य पदार्थांमुळे कार्बोहायड्रेट्स शोषून घेण्याची क्षमता कमी होते.