Translated By - Dipali Nevarekar
Image Source: Shutterstock
Read this in English
मी 32 वर्षीय महिला आहे. गेले तीन महिने मी नियैत जिममध्ये जाऊन 3 किलो वजन घटवले. मात्र आता मला वेळ नसल्याने संध्याकाळचा व्यायाम जिममध्ये होत नाही. मग आता जिममध्ये जाणे थांबवल्याने मी घटवलेले वजन पुन्हा वाढण्याची शक्यता आहे का ?
जीममध्ये जाणे थांबवल्यास तुमचे परत वजन वाढण्याचा धोका दाट आहे. अचानक हे वजन वाढणार नाही. मात्र जीम सोडल्याचा दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसण्याची शक्यता दाट आहे. यामुळे वजन वाढू शकते. जिममध्ये व्यायाम केल्याने कॅलरी बर्न होतात, शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारते. त्याचा फायदा हळूहळू वजन घटवण्यास आणि त्यानंतर ते आटोक्यात ठेवण्यास होतो. फिटनेस एक्सपर्ट रोशनी शहा यांच्या सल्ल्यानुसार, व्यायाम करणे सोडल्यानंतर आपोआपच तुमचे मेटॅबॉलिझमदेखील कमी होते. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणेदेखील अवघड होते. म्हणूनच या 6 पदार्थांनी वाढवा मेटॅबॉलिझम
इतर कोणते दुष्परिणाम होतात ?
जिम सोडल्यानंतर तुमचा फीटनेसदेखील कमी होतो. अॅरोबिक्सचा व्यायाम सोडल्यानंतर तुमचा कार्डीयोव्ह्सक्लुलर फीटनेस पहिल्या तीन आठवड्यात कमी झाला असेल. यामुळे तुमच्या स्नायूंची मजबुततादेखील कमी झाली असेल.
तुमचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सेलिब्रिटी एक्सपर्ट मरिका जॉनसन यांनी सुचवलेल्या या खास टीप्स
- जिम बंद झाल्यानंतरही तुमच्या शरीराची हालचाल होईल याची काळजी घ्या. किमान 30 मिनिटे कार्डियो व्यायाम आठवड्यातून तीन वेळेस करावा. स्वतःला नॉन जिम अॅरोबिक अॅक्टिव्हीटीमध्ये गुंतवा. यामध्ये जॉगिंग, रनिंग, सायकलिंग यासारख्या व्यायाम प्रकारांचा समावेश करा. यामुळे कॅलरी कमी होण्यास मदत होते.
- स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकता. यामध्ये डम्बल्स, केटलबेल्सचा वापर करा. यामुळे तुमचे मेटॅबॉलिझम सुधारेल.
- किमान 5000 पावलं नियमित चालल्यासदेखील तुमचे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे जवळच्या अंतरासाठी गाडीचा वापर करण्याऐवजी चालत ये-जा करा. लिफ्टऐवजी पायर्या चढून जा. चालल्यामुळे कॅलरीज बर्न होतात. सोबतच तुमचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. ( नक्की वाचा : जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज ! )
- व्यायामासोबतच तुम्ही काय खात आहात हेदेखील महत्त्वाचे आहे. रिफाईन्ड फूड खाणे टाळा. डाळ, धान्यं, फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. ट्रान्स फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, कोलेस्टेरॉल, साखर यांचे प्रमाण कमी असलेले पदार्थ आहारात ठेवा. तुमच्या शरीराला आवश्यक कॅलरींचा आहारात समावेश करा. स्त्रियांना 2000 kcal, तर पुरूषांना 2500 kcal यांची गरज असते.