Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

वजन वाढवण्यासाठी मास गेनर्सचा पर्याय निवडणे योग्य आहे का ?

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Image Source: Shutterstock

Read this in English

वजन वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे मास गेनर घेणे योग्य पर्याय आहे का ? मला वजन वाढवण्यासाठी त्याची मदत घेण्याचा मोह होतो. मात्र त्याच्या दुष्परिणामांची भीती वाटते. त्याचा वापर खरंच त्रासदायक आहे का ? 

सुदृढ शरीरयष्टी व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यास मदत करते. मात्र वजन आरोग्यदायी मार्गाने वाढवणे हाच सुरक्षित पर्याय आहे. अनेकांना बाजारात मिळणार्‍या मास गेनरचा मोह होतो. त्याचा वापर करण्याआधी तुमचे वजन वाढवण्यासाठी आवश्यक कॅलरी आहारात शरीरात जातील याचा प्रयत्न करावा. दर दिवसाला गरजेनुसार हळूहळू कॅलरी वाढवण्याचा प्रयत्न करा. दर दिवसाला 500 कॅलरी वाढवा. यामुळे दर आठवड्याला 0.5 किलो वजन वाढायला मदत होईल. कालांतराने कॅलरीजची गरज पूर्ण करणे कठीण झाले की तुम्ही मास गेनरची मदत घेऊ शकता. त्याच्या मदतीने तुम्ही आवश्यक अधिक कॅलरीज मिळवू शकता. (नक्की वाचा : वजन वाढवायचे 10 ‘हेल्दी उपाय ‘ )

‘तुमचा आहार चौकस नसेल तर केवळ मास गेनर च्या मदतीने  वजन वाढायला मदत होणार नाही. अनेकदा डाएटच्या / वजन वाढवण्याच्या नावाखाली चूकीचे पदार्थ खाल्ले जातात.’ असा अर्णव सरकार सांगतात. सप्लिमेंट्सशिवाय ‘हेल्दी’ मार्गाने वजन वाढवण्यासाठी खास डाएट टीप्स तुम्ही नक्की जाणून घ्या.

बाजारात अनेक मास गेनर्स उपलब्ध आहेत. त्यामधील अनेक नामांकीत मास गेनर्स घेणे अगदीच सुरक्षित आहे. मात्र नकली,  खोटे दावे करणारी स्वस्तात मस्त मास गेनर्सचे सेवन टाळा. ‘ तुम्ही काही प्रमाणात मास गेनर्स प्या. त्याच्यामुळे तुम्हांला त्रास झाला तर मास गेनर्स बदलून तुम्ही दुसर्‍या ब्रॅन्डच्या मास गेनर्सची निवड करा.’ असा सल्ला सरकार देतात. मास गेनर्ससोबतच योगासनांचा फायदादेखील वजन वाढवण्यासाठी होतो. त्यामुळे नियमित व्यायाम , डाएट सोबत योगाभ्यासदेखील नक्की करा.


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles