आजकाल खाण्या-पिण्याच्या सवयी, जीवनशैलीमधील बदल यामुळे अनेकांमध्ये हृद्यविकारांचा धोका वाढला आहे. तरूणांमध्येदेखील ह्र्द्यविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे. येत्या काही वर्षात या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास हृद्यविकार जडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. शारीरीक ताणतणावासोबत मानसिक आरोग्यात झालेले बिघाडदेखील हृद्यविकाराचा धोका वाढवतात. असे मत पद्नमश्री पुरस्काराने सन्मानित सर गंगाराम हॉस्पिटल व एम्स- दिल्ली येथील ज्येष्ठ हृद्यरोगतज्ञ डॉ. सुभाषचंद्र मनचंदा यांनी व्यक्त केले आहे.
21 जून रोजी साजरा होणार्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून नॅशनल हेल्थ एडीटर्स कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान ‘योगाअभ्यासा’वर माहिती आणि विविध आजारांवर योगाअभ्यासाने कशी मात करता येईल याबाबत तज्ञ डॉक्टर आणि योगा प्रशिक्षकांनी एकत्र येऊन माहिती दिली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात एम्स हॉस्पिटल्सचे ह्द्यरोगतज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्द्ययरोगींनी हार्ट अटॅकनंतर व्यायाम करणे अगदीच सुरक्षित असल्याचे म्ह्टले आहे.
डॉ. मनचंदा गेली 20 वर्ष या क्षेत्रात कार्यरत असून 80,000 हून अधिक रुग्ण योगाअभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हद्यविकाराच्या झटक्यानंतर अॅन्जियोप्लास्टी किंवा बायपास सर्जरी केली जाते. त्यानुसार रुग्ण अॅन्जियोप्लास्टीनंतर चार दिवसात तर बायपासनंतर तीन महिन्यात योगाअभ्यास सुरू करू शकतो. योगाअभ्यासामुळे ह्द्यविकाराचा झटका परत येण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण 50% कमी होत असल्याचेदेखील डॉ. मनचंदा यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्या व्यक्तींना वयोमानानुसार जमिनीवर बसून व्यायाम करणे शक्य नसते त्यांनी खूर्चीवर बसून व्यायाम केल्यास तोही तितकाच फायदेशीर ठरतो असा सल्ला डॉ. मनचंदा यांनी दिला आहे.
ह्द्यविकाराच्या रुग्णांसाठी कोणती आसनं फायदेशीर आहेत ?
उत्कटासन,दृढासन यासोबतच प्राणायम आणि मुद्रा अभ्यासानेदेखील ह्र्द्यविकाराच्या रुग्णांना निश्चितच फायदा होतो. केवळ योगाअभ्यासाने रक्तातील साखर नियंत्रणात आणाणार्या मधूमेहीची सत्यकथा नक्की वाचा.