मेष –:
या आठवड्यांत तुम्हांला व्हायरल इंफेक्शन होण्याची शक्यता असल्याने शरीराकडून मिळणार्या संकेतांकडे लक्ष ठेवा आणि वेळीच उपाय करा. सोबतच कमकुवत पचनशक्ती तुम्हांला अधिकच त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे औषधांची टाळाटाळ करू नका. तसेच व्यायाम आणि जेवणाची वेळ पाळा. यामुळे तुमची आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
वृषभ -:
तुमच्या राशीतील शनी आणि सूर्याची स्थिती पाहता तुमचे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. व्हायरल इंफेक्शनपासून दूर रहा. घसा खवखवण्याची शक्यता आहे. रक्तदाबाचा त्रास होत असल्यास नियमित चेकाअप करून घ्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
मिथुन -:
‘गणेशा’च्या सल्ल्यानुसार या आठवड्यांत सर्दी-खोकल्याकडे दूर्लक्ष करू नका. अन्यथा त्याचा अधिक गंभीर त्रास होण्याची शक्यता आहे. शरीराच्या खालच्या भागाला इजा होण्याची शक्य ता आहे. रक्तदाब किंवा मधूमेहासारख्या आजारांशी तुम्ही सामना करत असल्यास या आठवड्यांत विशेष दक्षता घ्या. वेळच्या वेळी औषध घ्यावीत.
कर्क -:
तणावपूर्ण परिस्थितींमुळे या आठवड्यांत तुम्हांला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. तुमची पचनशक्ती कमकुवत होण्याची शक्यता अधिक आहे. या आठवड्यांत शांत आणि आरामदायी राहण्याचा प्रयत्न करा यामुळे तणाव आणि आरोग्यही सुधारेल. तसेच दातदुखीची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने त्यावर वेळीच योग्य उपचार करा.
सिंह -:
या आठवड्यात तुमचे आरोग्य ठणठणीत राहील. परंतू पचनाचे विकार, सर्दी-पडसे अशा समस्या डोके वर काढण्याची शक्यता आहे. परंतू म्हणून आरोग्याची हेळसांड न करता चांगल्या सवयी बाळगा.
कन्या -:
या आठवड्यात आरोग्यसंबंधित फारश्या तक्रारी नसल्या तरीही काही पचनाचे विकार तुम्हांला पुन्हा त्रास देऊ शकतात. त्यामुळे औषध, व्यायाम याचा नियमित सराव करा.
तूळ -:
काही जुने विकार पुन्हा त्रासदायक ठरण्याची चिन्हा असल्याने आरोग्याची विशेष काळजी घ्या. काही औषधी वनस्पती तुम्हांला यावर परिणामकारक निकाल देऊ शकतील. इतरांसाठी हा आठवडा आरामदायी असला तरीही सर्दी, खोकला अशा लहान-सहान आजारांकडे दूर्लक्ष करू नका.
वृश्चिक -:
सर्दी -खोकला असे लहान आजार त्रासदायक वाटत नसले तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हांला महागात पडू शकते. अशा आजारांवर वेळीच उपचार न केल्यास त्याची गंभीरता वाढल्याने तुम्हांला सक्तीचा आराम करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यमवयीन लोकांनी जीवनशैलीत होणार्या बदलांकडे लक्ष द्यावे.
धनु -:
या आठवड्यात शनी आणि शुक्राच्या प्रभावामुळे आरोग्यासंबंधित कुरबूरी वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन चालणार्या काही आजारांशी सामना करत असल्यास काळजी घ्या. सांधेदुखीच्या रुग्णांनी औषधांमध्ये बदल करून पहावा.
मकर -:
पचनाच्या विकारांवर तात्काळ औषधोपचार करून घेणेच तुमच्यासाठी हितावह आहे. अन्यथा तुमचे आरोग्य चांगले आहे.मध्यमवयीन व वृद्ध लोकांनी मधूमेह, रक्तदाब अशा आजारांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. काही अनियमित लक्षणं आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कुंभ -:
या आठवड्यात ग्रहांचा तुमच्या राशीतील प्रभाव पाहता काही आजार गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजारांची लक्षण दिसताच त्यावर उपाय करा. वयोवृद्ध लोकांनी फीट राहण्यासाठी संध्याकाळी चालण्याचा व्ययाम करावा.
मीन -:
या आठवड्यात सिझनल फ्ल्यू तसेच लहान-सहान आजार यांमुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. काही दिवस तुम्हांला सक्तीचा आराम करण्याची गरज आहे. त्यामुळे काही प्रतिबंधात्मक उपाय करूनच आजारांवर नियंत्रण मिळवा. तसेच जंक-फूड खाणे टाळा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.