Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मधूमेहींनो ! जांभूळ खा आणि ब्लड-शुगर नियंत्रणात ठेवा

$
0
0

मधूमेहावर रामबाण उपाय म्हणून  कारल्याचा रस सुचवला जातो. पण तुम्हांला त्याच्या अतिशय कडवट चवीमुळे तुम्ही टाळाटाळ करताय ? मग मधूमेहावर चविष्ट आणि रामबाण घरगुती उपाय म्हणजे ‘जांभूळ’ !  प्राचीन काळापासून मधूमेहाच्या अनेक औषधांमध्ये जांभळाचा वापर केला जातो. फक्त रसच नव्हे तर  जांभळाच्या बीयादेखील मधुमेहाची लक्षण आणि शक्यता कमी करण्यास मदत करतात.

  • का आहे जांभूळ फायदेशीर ? 

जांभळामध्ये असलेले ‘जांभोलन’नामक ग्लुकोसाईड हे नैसर्गिकरित्या मधूमेह  नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. एका संशोधनानुसार जांभळामुळे रक्तातील वाढलेली साखर 30% कमी होण्यास मदत होते. तसेच मधूमेहामुळे जडणारे इतरही आजार नियंत्रणात राहतात. जांभूळ हे झटपट रक्तातील साखर वाढवत नसल्याने मधूमेहींसाठी त्याचे सेवन हितावह आहे.

  • कसे वापराल ?

मधूमेही  खालील दोन प्रकारे जांभळाचा त्यांच्या आहारात समावेश करू शकतात-

  1. रक्तातील  साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सकाळी 5-6 जांभळं अवश्य खावीत.
  2. चमचाभर जांभळाच्या बीयांची  पावडर कपभर दूध/ गरम पाणी किंवा अर्धा  कप दह्यांत मिसळून दिवसांतून दोनदा प्यायल्यास तुम्हांला नक्कीच फायदा होईल.

मधूमेह हा अनुवंशिक आणि पूर्णपणे बरा होण्यास थोडा कठीण आजार असल्याने वेळीच त्याचे निदान होणे गरजेचे आहे. मग तुम्ही मधूमेहाच्या या लक्षणांकडे दूर्लक्ष तर नाही करत ना ? 

  • संबंधित दुवे -

मधुमेहींसाठी खास औषधी चहाचे 5 पर्याय !

 मधुमेहींनी साखरेऐवजी ‘मध’ खावे का ?

 मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

References:

  1. Ayyanar M, Subash-Babu P, Ignacimuthu S. Syzygium cumini (L.) Skeels., a novel therapeutic agent for diabetes: folk medicinal and pharmacological evidences. Complement Ther Med. 2013 Jun;21(3):232-43. doi: 10.1016/j.ctim.2013.03.004. Epub 2013 Apr 25. Review. PubMed PMID: 23642956.
  2. H K Bakhru, Natural Home Remedies for Common Ailments, Orient Paperbacks, 1996, 232p

Translated By  -  Dipali Nevarekar

Source – jamuns-a-natural-remedy-to-control-your-diabetes

छायाचित्र सौजन्य – Getty Images

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>