Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
चूकीची संगत किंवा धुम्रपान, ड्रग्ज्सची भुरळ तरूण मुला-मुलींना सहज लागते. अशावेळी नशेबाजीमध्ये जीवनातील महत्त्वाचा काळ वाया घालवून आरोग्याची हेळसांड करण्याऐवजी त्यापासून मुलांंना वेळीच दूर ठेवणे गरजेचे असते. यामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. म्हणूनच आपल्या पाल्याच्या बोलाण्यातून – चालण्यातून त्यांच्यांमध्ये होणारे हे बदल कसे ओळखावे हे या लक्षणांंवरून वेळीच ओळखा.
च्युईंग गम
च्युईंग गम चवीला मस्त असतात, किंवा मुखशुद्धी क्वचित खाण्याची सवय अनेकांना असते. परंतू तुमच्या मुलांजवळ सतत च्युईंग गम आढळत असल्यास त्याचा वापर सिगारेटचा वास दूर करण्यासाठी त्यांच्या कडून केला जाऊ शकतो. प्रत्येकवेळी घरी आल्यावर त्यांच्या तोंडात च्युईंग गम असल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवा.
माचिस / लाईटर
स्वतःजवळ माचिस किंवा लाईटर प्रामुख्याने केवळ धुम्रपान करणार्या व्यक्तीच ठेवतात. त्यामुळे मुलांच्या बॅगा, पाकिटं क्वचित तपासा. काही विचित्र गोष्टी आढळल्यास त्यांच्यावर थोडे लक्ष ठेवा. त्याबाबत मुलांना विचारा.
मुलं ड्रग्ज्स घेतात का ? हे कसे ओळखाल?
- रोलिंग पेपर
रोलिंग पेपर हा एक ट्रान्सपररंट (पारदर्शक) आणि पातळ कागड असतो. ज्याच्या गुंडाळ्या करून वापर केला जातो. तुमच्या मुलांच्या बॅगेमध्ये , कपाटामध्ये आढळल्यास त्यांना तात्काळ विचारा.
- अवाजवी पैसे उधळणे
महिना संपायच्या आधीच तुमच्या मुलांचा पॉकेट मनी दर महिन्याला संपणे या लक्षणाला नजरेआड करू नका. व्यसनांची नशा करताना सतत अधिक प्रमाणात पैसा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडील पैसा कोठे जाति याबाबत पालकांना कल्पना असणे गरजेचे आहे.
- लाल डोळे
डोळे लाल होणे, लहान होणे हे लक्षण व्यसनांची नशा झाल्यानंतर दिसून येतात. त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवतो.
- आयड्रॉप्सचा वापर
नशेबाज लोकं त्यांच्या डोळ्यातील लालसरपणा कमी करण्यासाठी आय ड्रॉप्सचा वापर करतात. त्यांच्याजवळ अशा प्रकारचे कोणतेही आय ड्रॉप्स आढळल्यास त्याबद्दल विचारणा करा.
- अतिप्रमाणात वजन कमी होणं
नशेबाज लोकांमध्ये अचानक वजन घटण्याचे लक्षण आढळून येते. हिरॉईन सारखे ड्रग्ज घेत असलेल्यांमध्ये हे लक्षण आढळते.
- एकटं राहण्याची इच्छा वाढणं
घरातल्यांसोबत एकत्र फिरणं, बोलणं कटकटीचे वाटणे , त्यांच्या खोलीतून बाहेर पडणं नकोसं वाटणं ही लक्षणं गंभीर असू शकतात. पौडंगावस्थेतील मुलं नाजूक वळणावर असल्यास ती आत्ममग्न होतात. पण मुलं सतत चिड चिड करत असल्यास त्यांच्या कडे लक्ष द्या.