छायाचित्र सौजन्य – EROS
आजकाल मुलदेखील खांद्यावर रुळतील इतके लांब केस वाढवतात. रवी जाधव दिग्दर्शित आगामी ‘बॅन्जो’ चित्रपटामध्ये अभिनेता रितेश देखमुख याचे खांद्यावर रुळणारे केस येत्या काही दिवसांत मुलांमध्ये नवा हेअर ट्रेंड होण्याची शक्यता आहे. अनेक मुलांना लांब केस वाढवणे पसंद असते पण ते सांभाळायचे कसे हा यक्ष प्रश्न अनेकांना पडू शकतो. अशांंसाठी हा खास लूक सांभाळण्यासाठी एक्सपर्ट टीप्स
- हेअर प्रोडक्ट्सची माहिती घ्या
केस वाढवण्यासाठी थेट प्रयत्न करावे लागत नसले तरीही त्याला सांभाळण्यासाठी थोडे विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी हेअर स्टाईलिस्टकडून तुमच्या केसांच्या पोतानुसार योग्य शाम्पू, कंडीशनर आणि सिरमची निवड करून घ्या. तसेच हेअर क्रीम आणि स्टाईलिंग प्रोडक्ट्सची निवडही त्यांच्या सल्ल्याने करा.
नेहमी हेअर स्टाईलिंग टूल्स वापरणे केसांचे नुकसान करू शकते. ज्यूस सलोन अॅन्ड अकॅडमीचे टेक्निकल डिरेक्टर अंबरीन फिरोज यांच्या सल्ल्यानुसार केसांत जटा होऊ नयेत म्हणून मोठ्या दातांची तसेच उत्तम दर्जाचे हेअरब्रश वापरावेत.
- योग्य वेळी ट्रीम करा
केस वेळोवेळी ट्रीम केल्यास त्याचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होईल. तसेच केस सतेज दिसायला मदत होईल. अंबरीनच्या सल्ल्यानुसार, केस ट्रीम केल्याने स्प्लीट एंड्स / दुतोंंडी केसांची समस्या कमी होण्यास तसेच केसांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल. दर 6-8 आठवड्यांनी केस ट्रीम करणे फायदेशीर ठरते. हेअर कट निवडतानादेखील केसांचा पोत आणि दाटपणा लक्षात घेऊन निवड करा. पुरूषांना ‘हटके’ लूक देतील या ’4′ सेलिब्रिटी हेअर स्टाईल्स
- केस ओले असताना टॉवेलने घासू नका
ओले केस पटकन तुटण्याची शक्यता असते. पातळ केस असणार्यांमध्ये केसगळतीचा त्रास अधिक प्रकर्षाने जाणवतो.म्हणूनच केस नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्यावेत. त्यांना टॉवेलने घासणे किंवा हेअर ड्रायरने सुकवणे अधिक त्रासदायक ठरू शकते.
- केसांचा पोत
तुमचे केस हेल्दी आणि सतेज असतील तरच ते वाढवण्यात अर्थ आहे. त्यामुळे केसांमधील शुष्कता कमी करण्यासाठी प्रयत्न करा. केस वाढवल्यानंतर त्यामधील फ्रिझीनेस कमी करण्यासाठी लिव्ह इन सेरम वापरा. तसेच थेट सूर्यप्रकाशापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. सूर्यप्रकाशातील युव्ही रे केसांचा पोत खराब करण्यास कारणीभूत ठरतात.यासोबतच केसांचा पोत खराब करण्यामागे क्लोरिनाईड पाणी कारणीभूत ठरू शकते. लिव्ह इन कंडीशनर आणि क्लेरिफाइंग़ शाम्पू केसांचे नुकसान कमी करतात.
- अति घट्ट बांधू नका
केसांना घट्ट बांधणे टाळा. अंबरिनच्या मते,’ पोनिटेल बांधणार असाल तर तो घट्टपणे आणि वर बांंधू नका. ‘
- नैसर्गिक उपाय
केस धुताना शाम्पू किंवा कंडीशनरचा वापर करण्यासोबतच काही नैसर्गिक उपायांनी देखील त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. केसांवर कोरफडीचा गर लावल्यास टाळूवरील तसेच केसांंमधील शुष्कता कमी होण्यास मदत होईल. यामुळे शुष्कता कमी करण्यासोबतच तेलकटपणा कमी होण्यासही मदत होते.