Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

घरच्या घरी कसा बनवाल पनीर ?

$
0
0

आजकाल हॉटेल्स,रेस्ट्रॉरंटमध्ये गेल्यानंतर स्टार्टस पासून  ते खाण्याच्या मेन कोर्सपर्यंत पनीरचा वापर केला जातो. शाकाहारींसाठी पनीर हा प्रोटीनचा पुरवठा करणारा एक प्रमुख घटक अअहे. परंतू आजकाल पदार्थ विकताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. दुग्धजन्य पदार्थ हे नाशवंत असल्याने त्यामध्ये भेसळ केलेले पदार्थ आरोग्यावर दुष्परिणाम करतात. त्यामुळे बाजारातून पनीर आणून त्याचा आहारात समावेश करण्याऐवजी पनीर घरच्या घरीदेखील बनवू शकता. मग पहा कसा बनवाल घरगुती पनीर

साहित्य –

एक लीटर दूध

चमचाभर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर

ग्लासभर पाणी

मलमलचे कापड

कॉर्नफ्लॉवर

कृती -

एक लीटर दूध उकळत ठेवा.

एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये चमचाभर व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळा.

हळूहळू तुम्हांला दूध फाटल्यासारखे दिसेल.  त्यानंतर गॅस बंद करा.

गाळण्याने फाटालेले दूध गाळून घ्या. यामधील पाणी आणि फाटलेले दूध वेगवेगळे होईल.

पाणी बाजूला ठेवून केवळ फाटलेल्या दूधावर पाणी ओता. आणि पुन्हा गाळून घ्या.

फाटलेल्या दूधाचा गोळा चमचाभर कॉर्नफ्लॉवर मिसळून मळून घ्यावा.

मळलेला गोळा कापडामध्ये घट्ट बांधून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

आवश्यक असेल तेव्हा तुम्ही हा घरगुती पनीर वापरू शकता.मात्र किमान 24 तासांच्या आतमध्ये पनीर वापरा.  दुग्धजन्य पदार्थ ताजे खाणेच आरोग्यदायी ठरतात. नक्की जाणून घ्या टेस्टी पनीरचे ’5′ हेल्दी फायदे !


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>