Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सनग्लासची निवड करताना या ’4′गोष्टींचे भान ठेवा

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

सनग्लासेस हे केवळ स्टाईशिल लूक देण्यासाठी नसतात. प्रामुख्याने सूर्यप्रकाशातील युव्ही किरणांपासून बचाव करण्यासाठी, डोळ्यांवर त्याचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी सनग्लासेस वापरण्याचा सल्ला दिला जातो.आजकाल रस्त्यावर जागोजागी स्टाईलिश पण हलक्या दर्जाचे सनग्लासेस विकले जातात. स्टाईलच्या मोहापायी अशा सनग्लासेसचा वापर डोळ्यांवर काय परिणाम करू शकतो ? तसेच सनग्लासेस विकत घेताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी आय स्पेशॅलिस्ट डॉ. ए के साहू यांनी दिलेल्या या खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.

युव्ही प्रोटेक्शन:  तुम्ही वापरत असलेला सनग्लास 100% युव्ही प्रोटेक्शन देणारा असावा. सूर्यप्रकाशातील युव्ही रे / किरण मोतिबिंदूचा त्रास वाढवू शकतात. तसेच वेदनादायी सनबर्नचा त्रास होऊ शकतो. युव्ही रेमुळे रेटीनाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे दृष्टीचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे सनग्लासची निवड करण्यापूर्वी ती युव्ही प्रोटेक्टेड आहे की नाही याबद्दल तपासणी करून घ्या.  नक्की वाचा : डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजक अन महत्त्वपूर्ण गोष्टी !

फिटींग: सनग्लासेसची फिटींग योग्य असणे गरजेचे आहे.अन्यथा युव्ही रे डोळ्याचे, अवतीभवतीच्या नाजूक त्वचेचे नुकसान करू शकतात. याचा अर्थ असा मूळीच नाही की मोठे सनग्लास वापरावेत. मात्र डोळे आणि त्याच्या आजूबाजूच्या त्वचेचे रक्षण होणे गरजेचे आहे.

पोलराईज्ड ग्लासेस : या ग्लासेसमुळे तीव्र उन्हांतही डोळ्यांना स्पष्टपणे दिसते. त्यामुळे सुर्यकिरणांपासून बचाव होत नसला तरीही प्रकाशकिरणं फिल्टर करण्यास मदत करतात. यामुळे समुद्र,पाणी, बर्फामध्ये  ग्लेअर कमी करण्यास मदत करतात. कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ? हे देखील जाणून घ्या.

आकार : सनग्लासची फ्रेम निवडताना काळजी घ्या. जर चेहरा गोलाकार असेल तर आयताकृती फ्रेम निवडा. जर जबड्याजवळचा भाग लहान आणि मोठे कपाळ असल्यास अ‍ॅव्हिएटर्सची निवड करा.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>