मी 24 वर्षीय तरूणी असून माझ्या हाताला सतत पाणी सुटते. वातावरणात आर्द्रता,उष्णता नसली तरीही माझे हात ओले होतात. मला सतत हात रुमालाने किंवा टीश्यू पेपरने पुसावे लागतात. विनाकारण अशाप्रकारे घाम येण्यामागे कोणता आजार तर नाही ना ?
फोर्टिस हॉस्पिटल्स मुलुंडचे कन्सलटंट फिजिशयन डॉ. प्रदीप शहा यांनी या समस्येवर मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार, हाताच्या तळव्यांना येणे हा आरोग्याच्या दृष्टीने चिंंतेचा विषय नाही. उन्हाळ्याच्या दिवसात हवेतील आद्रतेमुळे हाताला पाणी सुटण्याची समस्या अनेकांमध्ये आढळते.वातावरणामध्ये बदल झाल्यास अतिप्रमाणात घाम येतो. यालाच हायपरहिड्रोसिस म्हणतात.
ज्या व्यक्तींच्या हाताला अतिप्रमाणात घाम येतो त्या समस्येला पामर हायपरहिड्रोसिस म्हणतात. काही वेळेस वातावरणातील बदलांमुळे किंवा अतिश्रमाच्या कामांमुळे घामाच्या ग्लॅन्ड्स अधिक प्रमाणात वाहायला लागतात. अशावेळी हाताला घाम येण्याचे प्रमाण वाढते.
काही वेळेस मनात चलाबिचल असल्यास, भीती वाटत असल्यास किंवा तणावाच्या, अति उत्साहाच्या क्षणीदेखील हाताला घाम येतो. घाम येणार्या ग्लॅन्ड्स हातामध्ये आणि पायामध्ये असतात. त्यामुळे सुख दु:खाच्या अति उत्साहाच्या क्षणी त्या उत्तेजित होण्याचे प्रमाण अधिक असते.
मानसिक अस्वस्थता आणि ताणतणाव याव्यतिरिक्त कोणताही आजार असण्याची शक्यता नाही.हाताला येणं हा आजार नाही. यामध्ये केवळ घाम येण्याचे नियमित प्रमानापेक्षा अधिक असते. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय करा.