Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आईस्क्रिमसारखी दिसणारी फ्रोझन डेझर्ट्स खरंच हेल्दी पर्याय आहे का ?

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

उन्हाळ्याच्या दिवसात आवडीनुसार विविध फळांची, फ्लेवर्सची आईस्क्रिम खाण्याचा मोह अनेकांना होतो. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिमचा वापर औषध म्हणूनदेखील होतो. पण आजकाल जीभेचे चोचले पुरवताना डाएटचं खूळ सांभाळणेदेखील अनेकांची गरज आहे. म्हणूनच बाजारात काही फ्रोझन डेझर्ट्स उपलब्ध आहेत. मग आईस्क्रिम आणि फ्रोझन डेझर्ट्स मधील नेमका फरक कसा ओळखावा आणि त्यापैकी आरोग्यदायी पर्याय कोणता हेदेखील ओळखणे गरजेचे आहे.

  • फ्रोझन डेझर्ट आणि आईस्क्रिम यामध्ये नेमका फरक कोणता  ?  

आईस्क्रिम आणि फ्रोझन डेझर्ट सारखेच वाटत असले तरीही त्यामधील घटक वेगवेगळे असतात. फ्रोझन  डेझर्ट हे व्हेजिटेबल फ़ॅटपासून तर आईस्क्रिम हे दूधापासून, मलईपासून बनवले जाते. अनेक ब्रॅन्ड्स डब्याच्या, आवरणावर कोपर्‍यात लहानशा अक्षरात फ्रोझन डेझर्टचा उल्लेख करतात. त्यामुळे पाहताच ते डोळ्यांना स्पष्टपणे दिसणे शक्य नसते.

  • फ्रोझन डेझर्ट आणि आईमध्ये किती कॅलरीज असतात?

डॉ. देबजानी बॅनर्जी (Incharge Dietetics, PSRI Hospitals) यांच्यामते,

  • फ्रोझन डेझर्ट:

एनर्जी : 20 kcal

फॅट : 10.5g

सॅच्युरेटेड फॅट : 5.8g

ट्रान्स फॅट : 0

  • आईस्क्रिम :

एनर्जी: 219 kcal

फॅट: 13g

सॅच्युरेटेड फॅट: 8.5g

ट्रान्स फॅट: 0.5g

त्यामुळे सहाजिकच फ़्रोझन डेझर्टमध्ये कोलेस्ट्रेरॉल नसते. नक्की वाचा : सतत गोड खाण्याच्या इच्छेवर मात करा या ’7′ उपायांच्या संगे !

  • मग नेमका आरोग्यदायी पर्याय कोणता ?

कॅलरी काऊंट पाहता फ्रोझन डेझर्ट अधिक आरोग्यदायी आहे. क्वचित प्रसंगी आईस्क्रिमचा आस्वाद घ्या. त्यामध्ये कार्ब्स, साखर, फॅट्स अधिक प्रमाणात आढळतात. असे नयाती हॉस्पिटल्सच्या आहारतज्ञ डॉ.  आस्था शर्मा सांगतात. फ्रोझन डेझर्ट आवडीनुसार घरीदेखील बनवता येऊ शकते. त्यासाठी क्रीम ऐवजी योगर्टचा वापर करा. यामुळे हा एक आरोग्यदायी पर्याय होण्यास मदत होईल. तसेच आईस्क्रीममध्ये लॅक्टोज अधिक प्रमाणात असल्यानेत्याचा त्रास / अ‍ॅलर्जी असणार्‍यांना आईस्क्रिमचा आनंद घेता येत नाही. आईस्क्रिमच्या तुलनेत फ्रोझन डेझर्ट पचायला सोपे असते.


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>