Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
मी 25 वर्षीय तरूणी असून माझी मासिक पाळी ठराविक दिवशी येत होती. काही वेळेस एखाद दिवस पुढे मागे होत असे. परंतू गेल्या काही महिन्यांपासून माझी पाळी 8-10 दिवस आधी येत आहे. या मागे काय कारण असू शकते ?
वेल वुमन क्लिनिकच्या कन्सलटंड गायनॅकोलॉजिस्ट डॉ. नुपूर गुप्ता यांनी या समस्येवर उत्तर दिले आहे.
पाळी ठरलेल्या तारखेच्या आधी येणे यामागे अनेक कारणं असू शकतात. ताण, ओरल कॉन्ट्रासेप्टीव्हचा वापर किंवा इतर शारिरीक समस्या यामुळे हा त्रास उदभवू शकतो. मासिक पाळी 15-20 दिवसांमध्ये आल्यास त्या समस्येला पॉलीमेनोरिया म्हणतात. हा त्रास प्रत्येक महिन्यात होत असल्यास वेळीच गायनकोलॉजिस्टचा सल्ला घ्या. काहीवेळेस पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे, अतिरिक्त ताणतणावामुळे हा त्रास होऊ शकतो. म्हणूनच योगा, ध्यानसाधनेचा अभ्यास करा. पोषक आहाराचा समावेश करा. नक्की वाचा : मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं
मासिक पाळी लवकर येण्यामागील कारणं ?
ताण : तुमच्यावरील ताण वाढतो तेव्हा शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामध्ये तणावाच्या हार्मोन्समुळे ग्लुकोजची निर्मिती होते, रक्तातील वाढलेली साखर आणि हाय पल्स रेटमुळे मासिक पाळीच्या चक्रामध्ये बदल होतात. परिणामी मासिकपाळी मागे किंवा पुढे जाते.
ओरल कॉन्ट्रासेप्टीव : ओरल कॉन्ट्रासेप्टीव्ह (गर्भनिरोधक गोळ्या) यासोबतच इमरजन्सी कॉन्ट्रासेप्टीटीव्हमुळे मासिकपाळीच्या चक्रामध्ये बदल होतात. त्यामध्ये हार्मोन्सचे प्रमाण अधिक असते. अचानक झालेल्या या बदलांमुळे रक्तप्रवाह होतो. नियमित मासिकपाळीच्या आधी काही दिवस पाळी येते. नक्की वाचा : गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
शारिरीक समस्या : मासिक पाळी लवकर येण्यामागे पेल्विक कंजेशन कारणीभूत ठरू शकते. तसेच ओव्हरीमध्ये होणारा दाह, पीसीओएस तसेच जेनिटल ट्युबर क्युलॉसिस यामुळेदेखील पाळी लवकर येते. सोबतच थायरॉईड डीसफंक्शन यामुळे रक्तास्त्राव होतो. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य निदान करून घ्या.
यासोबतच काही जण हाय कार्बोहायड्रेट, हाय फॅटयुक्त आहार घेतात. याचा परिणाम मासिक पाळी चक्रावर होतो. अति कार्बोहायड्रेट आणि फॅटयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर, चरबी वाढते. यामुळे लठ्ठपणा व मधूमेहाचा धोका वाढतो. हार्मोन्सच्या पातळीमध्ये बदल झाल्याने शारिरीक स्वास्थ्यदेखील बिघडते. मात्र काही सणसमारंभामध्ये औषधगोळ्यांऐवजी वेळेच्या आधी मासिकपाळी येण्याकरिता ’8′ घरगुती उपाय करा.