Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘सुल्तान’सलमान खानसारखी बॉडी बनवण्याचे खास फीटनेस फंडे !

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

छायाचित्र / व्हिडीयो सौजन्य – Yash raj Films

नव्वदीच्या दशकातील अनेक मुला-मुलींसाठी ‘सलमान खान’ हाच त्यांचा आवडता खान असणार. मग तो रोमॅटींक ‘प्रेम’ असो किंवा दबंग ‘ चूलबूल पांडे’. सलमानच्या चित्रपटातील खास आकर्षण असते ते म्हणजे किमान एखाद्या सीनसाठी शर्टलेस राहणं. त्यामुळेच सलमानच्या फीट बॉडी आणि सिक्स पॅक अ‍ॅब्सचं आकर्षण अनेकांना असतं. मग पहा सलमान खानचा काय आहे फीटनेस फंडा !

अनेक अ‍ॅक्श्ननपट चित्रपटातून सलमान खान रूपेरी पडद्यावर आपली जादू चालवून गेला अअहे. मात्र आगामी चित्रपट ‘सुल्तान’ मध्ये सलमान खान रांगड्या आवतारात आणि लाल मातीमध्ये खेळताना देसी अंदाजमध्ये दिसणार आहे. वयाची पन्नाशी पार केलेला सलमान खानने आगामी चित्रपट ‘सुल्तान’साठी  खास मेहनत घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या एका खेळाडूचे जीवन चित्रपटातून साकारण्यासाठी त्याने कुस्ती आणि मिक्स मार्शलआर्टचे प्रशिक्षण घेतल्याचे समजते.


कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर आहे, अनेक  रांगड्या कुस्तीवीरांना या शहराने घडवले आहे. म्हणूनच त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण गरजेचे आहे. यासाठी फीटनेस एक्सपर्ट, बॉडीबिल्डींग कॉन्टेस्ट प्रिपरेशन कोच हॅरी संधू यांच्या सल्ल्याने जाणून घ्या कशी बनवाल सलमानसारखी V-taper बॉडी

फाऊंडेशन एक्सरसाईज –  हा व्यायाम प्रमुख आणि गरजेचा आहे. यामुळे पाठीवरील स्नायू बनायला मदत होते. पण यासोबतच बॉडीबिल्डींगसाठी हे काही व्यायामदेखील करणे गरजेचे आहे.

1.   डेड लिफ्ट्स

2.    चिन अप्स आणि पूल अप्स

3.   बारबेल एंड

4.    सिटेड रोल्स

5.  लॅटरल पूल डाऊन्स

6.  वन आर्म डंमब्ल्स

डेड लिफ्ट्स,  चीन अप्स अ‍ॅण्ड पूल अप्स हे व्यायामप्रकार व्यायामादरम्यान अचूकतेने करणे गरजेचे आहे. कारण यामुळे इजा होण्याची  शक्यतादेखील दाट आहे. त्यामुळे तज्ञ फीटनेस ट्रेनर आणि जिममध्येच अशा प्रकारचे व्यायाम करा.

वर्कआऊट प्लॅन फायदेशीर कसा बनवाल ? 

कोणताही प्लॅन हा विशिष्ट काळापुरता मर्यादीत  असतो. हळूहळू त्याची शरीराला सवय होते. म्हणूनच परिणामकारक बदल पाहण्यासाठी तुम्हांला त्यात मॉडीफिकेशन किंवा बदल करत राहणे गरजेचे असते.

सॅम्पल फीटनेस प्लॅन

Day 1: चेस्ट , शोल्डर, ट्रायसेप्स

Day 2: क्वार्ड्स, हाम्स्ट्रिंग्स, ग्ल्यूट्स

Day 3: बॅक, बायसेप्स

Day 4: आराम

हा प्लॅन परत करा

शरीराचे मोठे अवयव जसे की, चेस्ट, लेग्स, बॅक, शोल्डर अशा अवयवांचा व्यायाम करताना चार भागांचे 3-5 व्यायाम करावेत. आर्म्सचे 2 व्यायाम 6-8 सेट्समध्ये करू शकाल.

डाएट आणि न्युट्रिशन 

मसल्स बनवताना डाएट साधे असणे आवश्यक आहे. साधे डाएट म्हणजे ते परिणामकारक नसते हा समज चूकीचा आहे. म्हणूनच त्यामध्ये टंगळमंगळ करू नका.

डाएटसाठी काही खास टीप्स

•    प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सयुक्त  3-6 पदार्थ प्रतिदिन आहारात ठेवा.

•   प्रत्येक जेवणात हिरव्या पालेभाज्या असाव्यात.

•    पुरेसे पाणी प्यावे.

•   नियमित ऋतूमानात उपलब्ध अस्णारी फळ 1-2 तुकडा इतकी खावीत.

•    जंकफूड खाणे टाळा.

  • मल्टी व्हिटॅमिन्स, फिश ऑईल आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट युक्त पदार्थ आहारात ठेवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

तुमच्या गरजेनुसार डाएटमध्ये बदल होऊ शकतात.

नियमित हे रूटींग फॉलो  करा. अपेक्षित बदल दिसून येत नसल्यास टेस्टेटसटेरॉन आणि हार्मोन्सच्या वाढीवर लक्ष द्या. त्याची तपासणी करून घ्या. हार्मोन्सदेखील वर्कआऊटच्या निकालावर परिणाम करतात. हार्मोन्सची पातळी सामान्य नसल्यास डाएट आणि एक्सरसाईज अपेक्षित परिणाम देणार नाही.

Harry Sandhu is an eminent fitness expert and a bodybuilding contest preparation coach. He is also the founder-director of Team Boss, an elite Australian based company specialising in physique transformations, bodybuilding contest preparation, and providing cutting edge world class education to trainers across the globe.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>