मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि तरूणाईच्या गळातल्या ताईत असणारा अभिनेता स्वप्निल जोशी याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. सोमवारी रात्री स्वप्नीलची पत्नी लीना हीने एका मुलीला जन्म दिला आहे. (नक्की वाचा : मुलीचा जन्म झाल्यानंतर बिल माफ ! – डॉ.गणेश राख यांचा अनोखा उपक्रम !)
Leena ani mi Aai-Baba jhaloy. Ghari Laxmi aalye. Mother-Daughter both doing well. Thank u all for the lovely wishes. pic.twitter.com/fKWu0w4uSU
— Yash Patwardhan (@swwapniljoshi) May 25, 2016
संजय लीला भंसाळी निर्मित आणि स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘ लाल इश्क’ हा सिनेमा येत्या 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन आणि सोबतच मिळालेली ही गोड बातमी जोशी कुटुंबीयांना डबल सेलिब्रेशनची संधी देणार आहे.
स्वप्नील आणि लीना जोशी यांचा विवाह 16 डिसेंबर 2011 रोजी औंरगाबाद येथे झाला होता. आता त्यांच्या कुटुंबामध्ये एका चिमुकल्या परीचे आगमन झाल्याने कुटुंबीयांप्रमाणेच त्यांच्या मित्र परिवारातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (नक्की वाचा : नवजात बाळाला भेटण्यापूर्वी या ’6′ गोष्टी अवश्य लक्षात ठेवा)
लाल इश्कच्या प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे स्वप्नील प्रमोशनच्या कामात व्यस्त असण्याची शक्यता दाट आहे, मात्र ‘बाबा’ झाल्याने आलेली ही नवी जबाबदारी सांभाळण्यासाठी काही वेळ राखीव ठेवणे गरजेचे आहे. मग पहा ‘ व्यस्त’ बाबांचा नव्या पाहुण्याशी बॉन्ड वाढवण्यासाठी काही खास टीप्स
1. बाळाला प्रत्यक्ष अधिकाधिक वेळ -
स्त्री बाळाला जन्म देते. त्यामुळे आईशी बाळाची नाळ खूप आधीपासून जोडलेली असते. तिच्याशी बाळाचा सतत स्किन टू स्किन संपर्क येतो. मात्र पुरूषांच्या बाबतीत ही संधी स्वतःहून काढणे गरजेचे असते. बाळासोबत काही वेळ नक्की घालवा. बाळाला जवळ घेतल्याने त्यांच्यासोबत प्रेमाचे, सुरक्षेचे बंध निर्माण होण्यास मदत होते.
2. बाळाशी बोलायला, संवाद साधायला सुरवात करा –
बाळाला सांभाळणे, त्यांना झोपवणंं हे केवळ आईचे काम असते असा विचार न करता त्यांच्याशी बोलायला, गाणी ऐकवायला, अंगाईगीत ऐकावायला सुरवात करा. या गोष्टी संस्काराचा भाग असतात मात्र त्या सोबतच त्यांच्याशी बॉन्ड बनायलादेखील मदत करतात. मुलं जसजशी मोठी होतील तसतसा त्यांच्यासोबत खेळायला, फिरायला वेळ राखून ठेवा. यामुळे तुमच्यावरील ताणही कमी होईल.
3. संयम वाढवा -
नव्या बाळाची बातमी कळताच फोन्स, शुभेच्छा आणि पाहुण्यांची भेटायला येणारी रीघ वाढणार हे नक्की ! मात्र त्या सार्यांना संयमाने स्विकारा. या दिवसात पत्नीमध्येदेखील अनेक बदल होतात. तिची चिडचिड, तारांबळ समजून घ्या आणि त्यातून बाहेर पडायला मदत करा.