Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
आजकाल धावपळीच्या काळात अनेकांना खाण्याचीही उसंत नसते. अनेकजण नाश्त्याचे पदार्थ स्वतःसोबत घेऊन फिरतात. वेळ मिळेल तेव्हा खातात. मग पराठे, पोळ्यांसारखे पदार्थ नरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलमध्ये बांधले जातात.मात्र अॅल्युमिनियम रिअॅक्टीव्ह असून त्यातील काही घटक अन्न पदार्थांमध्ये उतरतात परिणामी त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो.
स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये अॅल्युमिनियमचा वापर प्रामुख्याने केला जातो. मोठी भांडी, पातेली, चमचे, पॅन यांच्यामध्ये अॅल्युमिलीयमचे लाईनिंग असते. हाडांचे विकार असणार्यांमध्ये तसेच रेनल इम्पेअरमेंटच्या रुग्णांमध्ये अतिप्रमाणात अॅल्युमिनियमचे शरीरात जाणे घातक ठरू शकते.
अॅल्युमिलियम फॉईलमध्ये गरम पदार्थ गुंडाळू नये -
गरम गरम पदार्थ अॅल्युमिलियम फॉईलमध्ये बांधू नका. उष्णतेमुळे अॅल्युमिलियम पदार्थामध्ये उतरू शकते. यामुळे डिमेंशिया किंवा अल्झायमरचा धोका वाढतो. त्यापेक्षा चांगल्या कागदामध्ये चपाती, सॅन्डव्हिच गुंडाळा. असा सल्ला आहारतज्ञ प्रिया काथपाल देतात.
अॅसिडीक पदार्थ गुंडाळणे टाळा
जे पदार्थ नैसर्गिकरित्या अॅसिडीक असतात त्यांना अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळणे टाळा. त्यामुळे टॉमॅटो,व्हिनेगर,टोमॅटो सॉसयुक्त पदार्थ अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळू नका. आहारतज्ञ प्रिया यांच्या मते, पदार्थातील अॅसिडचा अॅल्युमिनियमशी संपर्क आल्यास मॉईश्चरायझर वाढते आणि पदार्थावर बॅक्टेरियाची वाढ होण्यास सुरवात होते.
टीप : उरलेले आणि शिळे अन्न अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये गुंडाळू नका. काचेच्या भांड्यामध्ये साठवा. तसेच अॅल्युमिनियमच्या फॉईलने झाकून पदार्थ शिजवू नका.
References
[1] Malluche HH. Aluminium and bone disease in chronic renal failure. Nephrol Dial Transplant. 2002;17 Suppl 2:21-4. Review. PubMed PMID: 11904354.
[2] Kawahara M, Kato-Negishi M. Link between Aluminum and the Pathogenesis of Alzheimer’s Disease: The Integration of the Aluminum and Amyloid Cascade Hypotheses. International Journal of Alzheimer’s Disease