Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दंंडबैठका मारल्याने मुलांची वाढ खुंटते का ?

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

माझा मुलगा 12 वर्षांचा असून तो बॅटमिंटन आणि स्क्वॅश खेळतो. त्याचे कोच त्याला स्वॅट्स (दंडबैठका) नियमित करायला सांगतात. यामुळे त्याची वाढ खुंटेल अशी मला भीती वाटते. खरंच दंडबैठका मारल्याने वाढ खुंटते का?

दंडबैठका म्हणजेच स्वॅट्स केल्याने वाढ खुंटते हा समज अनेकांच्या मनात असतो. पण तुमचा 12 वर्षांचा मुलगा नियमित दंडबैठका मारत असल्यास त्याला रोखू नका. हा चांगला व्यायाम प्रकार आहे. दंडबैठका मारल्याने वाढीवर काही दुष्परिणाम होत नाही. उलट यामुळे स्नायू बळकट होण्यास, हाडं मजबूत होण्यास तसेच इजा, अपघातांचा त्रास कमी होण्यास मदतच होते. शारिरीक व्यायाम जसे की, दंडबैठका  हा लहान मुलांमधील फायदेशीर व्यायामप्रकार आहे. यामुळे लहान मुलांमध्ये आढळणारी लठ्ठपणाची समस्या कमी होण्यास मदत होते. मात्र लहान मुलांनी उलटे पाय दुमडून का बसू नये ? हे नक्की जाणून घ्या.

दंडबैठका मारण्याचे फायदे -:

दंडबैठकाहा एक साधा सोपा बॉडीवेट व्यायाम आहे. यामुळे मुलांच्या शरीरातील स्नायू मजबूत  बनण्यास मदत होईल. घोटा आणि गुडघ्यांना बळ मिळेल. तसेच लिगामेंट मजबूत होतील. तसेच या व्यायामामुळे खांद्यावरील, पाठीवर ताण कमी होण्यास मदत होते. आजकाल मुलांच्या पाठीवर त्यांच्या वजना इतकेच दप्तराचे ओझे असते. यामुळे पाठीवर आणि खांद्यावर येणारा भार मोकळा होण्यास मदत होते.

मात्र दंडबैठकाचा व्यायाम योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी या काही टीप्स लक्षात ठेवा आणि त्यानुसार व्यायाम मुलांकडून करून घ्या.

मुलं दंडबैठका करताना त्यांचे दोन्ही हात कमरेवर आणि पाठ सरळ रेषेत असणे गरजेचे आहे.

दंडबैठका मारताना गुडघे वाकणार नाहीत याची काळजी घ्या.

तसेच दंडबैठका मारताना हिप्स थोडे वाकलेले आणि गुडघे उठताना मागच्या बाजूला करून उठावे. यामुळे धडपडण्याची शक्यता कमी होते.

मुलांना केवळ व्हिडियो गेम्स आणि घरातल्या अ‍ॅक्टीव्हिटीजमध्ये गुंतवून ठेवू  नका. त्यांना व्यायामाची, योगासनाची गोडी लावा. यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक  बदल दिसून येतील. तसेच त्यांच्या वागण्या-बोलण्यात, शारिरीक स्थितीमध्ये, वजनामध्ये आरोग्यदायी बदल होण्यास सुरवात होईल.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>