Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
दातदुखीचा त्रास फारच वेदनादायी असतो. अशावेळी कॉम्बिफ्लेमसारख्या पेनकिलर घेऊन तात्पुरता त्रास शमवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्याचा शरीरावर परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? काही अतिगरम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने अचानक तीव्र दातदुखीचा त्रास होतो. मग या दुखण्यावर इतर उपचारांपेक्षा काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय करणे अधिक फायद्याचे ठरते. दातदुखी कमी करण्यासाठी ‘पेरूची पानं’ फायदेशीर ठरतात. पेरूच्या पानांनी दातदुखीचा त्रास कमी करण्याआधी जाणून घ्या दातदुखीचा त्रास नेमका कशामुळे जडला आहे. ( नक्की वाचा : एका मिनिटात दातदुखी दुर करणारे घरगुती उपाय ! )
- पेरूच्या पानांनी कशी कमी होते दातदुखी ?
बॅक्टेरियल इंफेक्शन आणि दातांच्या अपुर्या स्वच्छतेमुळे अनेकांना दातदुखीचा त्रास होतो. यावर पेरूची पानं हा रामबाण उपाय आहे. पेरूच्या पानांमध्ये फ्लॅवोनॉईड्स तसेच अॅन्टी बॅक्टेरियल, दाहशामक घटक असल्याने दातदुखीचा त्रास कमी करण्यास नक्कीच फायदा होतो. दातदुखी कमी करण्यासोबतच पेरूच्या पानांमध्ये दडलेत ’7′आरोग्यदायी गुणधर्म !
- पेरूच्या पानांचा दातदुखी कमी करण्यासाठी कसा कराल उपयोग ?
पेरूच्या पानामधील दाहशामक घटक दातदुखीचा त्रास कमी करण्यासोबतच माऊथ अल्सरचा त्रास कमी करण्यासही फायदेशीर ठरतात. मग पहा कोवळ्या पेरूच्या पानांंचा दातदुखी कमी करण्यासाठी कसा कराल वापर ?
- ताजी पेरूची पानं तोडून स्वच्छ धुवा. ती कोवळी पानं दाताखाली चघळा. त्या पानांमधून निघणारा रस दुखणार्या दातांपर्यंत पोहचू द्या.
- दातदुखीचा त्रास कमी करण्यासाठी 3-4 ताजी पानं पाण्यात उकळा. त्यामध्ये मीठ मिसळून या पाण्याचा वापर माऊथवॉश म्हणून करा. दातदुखी कमी करण्यासाठी या पाण्याचा वापर करून गुळण्या करा आणि पाणी पुन्हा बाहेर फेका.
पेरूच्या पानांनी दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. परंतू हा एक घरगुती उपाय आहे. दातदुखीचा त्रास फारच वाढल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका.