Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
पूर्वीच्या काळी लग्नाचे वय झाले की मुलीचे नाव वधू-वर पक्षाच्या कार्यालयात दिले जात असे. त्यानंतर ‘कांदे-पोह्या’च्या कार्यक्रमानंतर कुटूंबासमवेत भेट करून लग्नाची बोलणी केली जात असे. मात्र आजकालचा काळ हा सोशलमिडीया आणि इंटरनेटचा आहे. दिवसभराच्या लहान सहान घडामोडींपासून ते अगदी डेटींग आणि साथीदार निवडीपर्यंत इंटरनेट एक महत्त्वाची भूमिका निभावते. ‘टिंडर’ हे आज तरूणाईमधील आवडते अॅप आहे. येथे मुलं मुली आभासी जगात एकमेकांना पाहू शकतात, त्यांची माहिती मिळवू शकतात. मग मुलांनो ! पहा तुम्हांला टिंंडरवर कोणत्या प्रकारच्या मुली भेटू शकतात.
1.बायसेक्श्युअल -
मुली त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्या ‘बायोसेक्श्युअल’ आहेत हे धडधडीत लिहतात हे पाहून माझ्यासारखे अनेकजण अचंबित झाले असतील. पण टिंडरवर अशा ‘मोकळ्या विचारा’च्या मुली आढळतात. अशा मुली सहाजिकच बेधडक, आत्मविश्वासू आणि हुशार असतात. तुम्ही त्यांंच्याशी मैत्री करू शकता. मात्र त्यांच्या फार जवळ जाण्याचा किंवा संबंध बनवण्याचा प्रयत्न करू नका. कालांतराने निराशा पदरी पडण्याची शक्यता अधिक असते.
2. ‘भाव’ खाणार्या आणि क्वचितच प्रतिसाद देणार्या -
काही हॉट मुलींंची प्रोफाईलदेखील टिंडरवर आढळतात. अनेकदा त्यामधील माहिती पुरेशी भरलेली नसते. केवळ लाईफस्टाईलचा एक भाग म्हणून त्यांची प्रोफाईल बनवलेली असतात. तसेच त्यांच्याकडून मेसेजला प्रतिसाद मिळण्याची शक्यता फारच कमी असते. अनेकदा या मुली घरातल्या लाडोबा असतात.
3.फेक प्रोफाईल -
अनेक मुलींंना टिंडरचा नेमका फायदा समजतच नाही. केवळ ऑनलाईन टेडींग अॅपचा अनुभव घेण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी अनेकजण खोटी प्रोफाईल बनवतात. यामध्ये प्रोफाईल पिक एखद्या अभिनेत्रीचा किंवा काही रॅन्डम असतो. स्वतःबद्दल कमी माहिती आणि एकही खरा फोटो कधीच न टाकणारी प्रोफाईल ही फेक असतात.
4. प्रेमाचं त्रिकूट -
प्रोफाईलमध्ये बायसेक्श्यूयल, खुल्या विचारांच्या मुला-मुलींशी मैत्री करणे पसंत असल्याचा खुलासा अनेक जणि करतात. मात्र वैचारिक पुढारले पणाची दाद देत त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी पुढे जाण्या पूर्वी थोडा विचार नक्की करा. कारण अनेकदा अशा मुली अनेकदा जुन्या साथीदारासोबतही संबंध ठेवायला हरकत नसल्याचे मानतात.
5. नो हुक अप्स गर्ल –
अनेकदा मुली ठळकपणे लिहतात की, टिंडरवर केवळ मित्र बनवणे हा त्यांंचा उद्देश आहे. वास्तविक जगात येऊन भेटणे किंवा स्वतःच्या आयुष्याबददल सार्या गोष्टी खुलेपणाने सांगणे त्यांना पसंंत नसते. यामागे ‘टिंंडर’ या डेटींग अॅप्सची असलेली ओळखही कारणीभूत ठरते. या अॅपवर प्रामुख्याने लोकं सेक्ससाठी साथीदारही शोधतात.
6.’फन लविंग’ मुली -
आनंदी आणि मुक्त राहणे अनेकांना पसंत असते. पण काही मुलींना खास प्रकारच्या ‘आनंदा’मध्ये विशेष उत्सुकता असते. अशा मुली नुकत्याच ब्रेकअपमधून बाहेर पडल्या असल्याची शक्यता दाट असते. त्यामुळे मानसिक ताण हलका करण्यासाठी अशा मार्गाची निवड केली जाते.