Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जिरं –मूळव्याधीचा त्रास दूर करण्याचा घरगुती उपाय

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मूळव्याधीचा त्रास फारच वेदनादायी असतो. अनेकांना या समस्यांना मोकळेपणाने बोलणे शक्य नसते.परंतू त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा या समस्येची गंभीरता वाढत जाते. मूळव्याधाच्या त्रासामध्ये शौचाच्यावेळेस वेदना होणे, त्यानंतर गुद्द्वाराजवळ सतत खाज येणे, शौचाद्वारा रक्त पडणे अशी लक्षणं दिसून येतात. मात्र याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे गरजेचे असते.

मूळव्याधीचा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतात. त्यापैकी एक म्हणजे ‘जिरं’. मात्र जिर्‍या व्यतिरिक्त मुळव्याधीच्या लक्षणांना दुर करा या ’8 ‘ नैसर्गिक उपायांनी !

  • कसे ठरते ‘जिरं’ फायदेशीर ?

जिर्‍यामध्ये मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, सोडीयम, पोटॅशियम, थायमिन, नायसिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यांचा मुबलक साठा असतो. त्यामुळे एकूणच स्वास्थ्य सुधारण्यासाठी जिरं फायदेशीर असते.

जिर्‍यामध्ये फायबर आणि रेचक क्षमता असल्याने पचनशक्ती सुधारण्यास आणि शौच मऊ होण्यास मदत होते. सोबतच जिरं पचनमार्गाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. इंफेक्शन कमी होण्यास मदत करतात. अन्नाचे पचन अधिक लवकर करण्यास मदत करतात. मूळव्याधीसोबतच जिरं आणि केळं- वजन कमी करण्याचा घरगुती उपाय आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

 

  • मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी कसा कराल जिर्‍याचा वापर ?

कोरडे जिर्‍याचे दाणे तव्यावर हलकेच भाजावेत.

थोडे थंड झाल्यावर जिर्‍याची पूड बनवा.

ही पूड हवामंद डब्ब्यामध्ये साठवा.

रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यामध्ये चमचाभर जिर्‍याची पूड मिसळा.

नियमित हे पाणी प्यायल्यास 3-4 दिवसांनी तुम्हांला हळूहळू मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होते.  

Reference: Herbs that heal — H.K.Bakhru


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>