Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
छायाचित्र सौजन्य – Shutterstoc
मेथी केवळ मधूमेहींसाठी फायदेशीर नसून केसगळतीची समस्या आटोक्यात आणण्यातदेखील मेथीचे दाणे गुणकारी आहेत. मेथीमुळे केसातील कोंडा, केसगळती तसेच अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. सोबतच केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात. डॉ. नेहा संल्वल्का यांच्यामते, आहारात मेथीचा समावेश केल्यास किंवा दाण्यांची पेस्ट टाळूवर लावल्यास केस चमकदार होण्यास मदत होते. .
मेथीच्या पानांमध्ये प्रोटीन तसेच निकोटीन अॅसिड आढळते, यामुळे केसांची वाढ सुधारण्यास मदत होते. त्यामुळे मेथीच्या पानांची पेस्ट टाळूवर लावून मसाज केल्यास केसांची वाढ सुधारते आणि मुळं अधिक घट्ट होतात. अल्कलाईसिंग घटक टाळूवरील त्वचेची पीएच पातळी राखण्यास मदत करतात. परिणामी केसगळती आणि केसातील कोंडा कमी करण्यास मदत होते.
केसांसाठी मेथीचा या चारप्रकारे करा नियमित वापर
1.एक टेबलस्पून मेथी पाण्यात उकळा आणि ते खोबरेल तेलात रात्रभर भिजत ठेवा. या तेलाने केसांना मसाज केल्यास केसगळती रोखण्यास मदत होते असे डॉ. नेहा सांगतात.
2. 3 टेबलस्पून मेथीचे दाणे कपभर पाण्यात सुमारे सहा तास भिजत ठेवा. मेथीदाण्यांची पेस्ट करून त्यामध्ये पाणी मिसळा. सोबत 3 टेबलस्पून शिकाकाई पावडर मिसळा. तयार मिश्रण टाळूवर हलक्या हाताने लावून 30 मिनिटांनी केस सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवा. हा प्रयोग आठवड्यातून एकदा केल्यास केसांची वाढ सुधारेल.
3. दोन टेबलस्पून मेथीचे दाणे पाण्यात 30 मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून टाका. भिजवलेल्या दाण्यांसोबत दोन टेबलस्पून सुकलेली मेथीची पानं आणि नारळाचं दूध मिसळा. ओल्या केसांवर ही पेस्ट लावून 20 मिनिटांनी ते स्वच्छ धुवा. यामुळे केस चमकदार आणि लांबसडक होतात.
4. दोन टेबलस्पून मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. ती मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवा आणि 30 मिनिटांसाठी केसांना लावा. पाण्याने केस स्वच्छ धुवा. यामुळे केसातील कोंड्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल.