Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सलमान खान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहयोगातून गरीबांना सवलतीच्या दरात उपचार

$
0
0

दबंगस्टार सलमान खानची जादू रूपेरी पडद्यावर जितकी चालते. तितकाच वास्तवातदेखील सलमान समाजउपयोगी कामं करण्यात  आघाडी असतो. दुष्काळग्रस्तांपासून गोर गरीबांंपर्यंंत आरोग्यसेवा खुली करण्यासाठी त्याच्या ‘बिईंग ह्युमन’ या एनजीओकडून विशेष प्रयत्न केले जातात. बीईंग ह्युमनतर्फे एक पाऊल पुढे टाकत आता सरकार दरबारी ‘रुरल मेडीकल एड फंड’ या नव्या योनजेची सुरवात करण्यात आली आहे. शुक्रवार 20 मे रोजी या योजनेचा शुभारंभ मंत्रालयात करण्यात आला.  या अंतर्गत अनेक आजारांवर गोर गरीबांना उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

 सलमान खानच्या बीईंग ह्युमन या योजनेअंतर्गत एक लाख  हृद्यविकाराच्या मुला-मुलींवर उपचार केले जाणार आहेत. तसेच पैशांच्या अभावी उपचार टाळणार्‍यांनादेखील या योजने अंतर्गत मदत मिळणार आहे. तर नव्या फंड योजनेतर्गत दोन लाखांंपर्यतचे उपचार करण्यास मदत मिळणार आहे.

  • कोणाला मिळणार ही मदत ? 

ज्या रुग्णांचे उत्त्पन्न लाखभरापेक्षा कमी आहे. अशांना ही मदत मिळू शकते असे सूत्रांकडून समजले आहे.

  • आवश्यक कागदपत्र 

केशरी किंंवा पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड

मुंबईबाहेर असल्यास हॉस्पिटलचे कोटेशन आवश्यक आहे.

Source: IANS

Image source: salmankhan/ Facebook page


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>