छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
कोलेस्ट्रेरॉलच्या पातळीमध्ये वाढ होणे किंवा मधूमेहाचा त्रास हा आजकाल अनेकांमध्ये दिसून येतो. यासोबतच आरोग्याला घातक जीवनशैली अनेक समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे जीवनशैलीत काही सकारात्मक बदल आणि नैसर्गिक उपाय केल्यास कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ
भारतीय घरात घरात आढळणारे एक झाड म्हणजे तुळस. धार्मिक महत्त्वाप्रमाणेच तुळस आरोग्यदायी असल्याने अनेका आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापर करणे फायद्याचे ठरू शकते. माऊथ अल्सर पासून ते रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यापर्यंत तुळस फायदेशीर ठरू शकते. या ’10′ आजारांना दूर करतील तुळशीचं पानं !
- कोलेस्टेरॉलवर तुळस कशी ठरते फायदेशीर ?
कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढल्यास स्वास्थ्य अनेकप्रकारे धोक्यात येऊ शकते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रेरॉलचे कण साचून राहिल्यास त्या अधिक कडक होतात. त्यामुळे रक्तदाबाच्या समस्या आणि हृद्यविकाराचा धोका बळावतो. तुळशीची पानं घातक कोलेस्टेरॉलचा धोका कमी करतात. तर आवश्यक कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढवतात. अननसाने ठेवा कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण !
- तुळशीच्या पानं मधूमेहावर फायदेशीर -:
तणावग्रस्त जीवनशैली तसेच त्यातून वाढणार्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी झपाट्याने वाढणारा एक आजार म्हणजे मधूमेह. मधूमेहींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे फार कष्टाचे काम आहे. परंतू तुळशीचे पानं चघळल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील हायपोग्ल्यासमिक गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. रक्तातील साखरेचे प्रमाण जितके नियंत्रणात राहते तितकी त्यामधील गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय नक्की करून पहा.
- कसा कराल तुळशीचा आहारात समावेश ?
तुळशीची 2-3 पानं खुडून स्वच्छ धुऊन नियमित सकाळी चघळा. किंवा तुळशीचा काढा बनवून तो प्यायल्यास स्वास्थ्य सुधारण्यास मदत होईल.
References:
1. Rai V, Fien U, Mani V, Iyer UM. Effect of Ocimum Sanctum leaf powder on blood lipoproteins, glycated proteins and total amino acids in patients with non-insulin dependent diabetes mellitus. J Nutr Environ Med.1997;7:113–8.
2. Giri J, Suganthi B, Meera G. Effect of Tulasi (Ocimum Sanctum) on diabetes mellitus. Indian J Nutr Dietet. 1987;24:193–8.