Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आरामदायी झोपेसाठी कशी कराल उशीची निवड ?

$
0
0

Read this in English 

 Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

काहींना उशीशिवायदेखील झोप येते तर काहीजण त्याशिवाय झोपूच शकत नाहीत. आजकाल बाजारात विविध स्वरूपात आणि विविध ठिकाणी वापरू शकू अशा उशा उपलब्ध आहेत. मग त्याची योग्य निवड कशी करावी हा प्रश्न तुमच्याही मनात आलाय ना ? मग उशीची निवड आणि चूकीच्या उशीमुळे होणारा त्रास याबद्दल इएनटी सर्जन आणि स्लीप अ‍ॅप्निया स्पेशॅलिस्ट डॉ.विकास अग्रवाल यांनी दिलेला हा खास सल्ला तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

  • उशीची निवड अचूक असणे का गरचेचे आहे ?

झोपेत असताना श्वसनाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी योग्य स्थितीत झोपणे गरजेचे आहे. मान ताठ असलेल्या स्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. मात्र चूकीची उशी निवडल्यास मानेला मिळणारा आधार कमजोर होतो. श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो परिणामी स्लिप अ‍ॅप्निया किंवा घोरण्याचा त्रास वाढण्याची शक्यता वाढते. म्हणूनच झोपण्यासाठी योग्य उशीची निवड करा. उशी अगदीच नरम किंवा कडक असू नये. उशीचा आकार, उंची आणि नरमपणा योग्य असावा. तुम्हांला स्लीप अ‍ॅप्निया किंवा घोरण्याचा त्रास असेल तर अ‍ॅन्टी स्नॉरिंग उशीची निवड करा. यामुळे घोरण्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

कशी कराल उशीची अचूक निवड ? 

डॉ. अग्रवाल यांच्यामते, उशीची निवड करताना या गोष्टींचा विचार अवश्य करावा.

# खांद्यांची लांबी :

खांदे रूंद आणि लांब असतील तर उशीदेखील त्यानुसार लांब असावी. स्त्रीयांपेक्षा पुरूषांचे खांदे रुंद असतात. त्यामुळे त्यांच्या उशा मोठ्या असणे आवश्यक आहेत. उशीमुळे खांदे आणि डोक्यामधील अंतर भरुन निघते. तसेच शरीराची स्थिती आरामदायी राहण्यास मदत होते. नक्की वाचा : डाव्या कुशीवर झोपणे का ठरते फायद्याचे ?

उशीचा मऊसरपणा किती असावा :

उशी अतिशय मऊ किंवा कठीण नसावी.  अतिमऊ उशी वापरल्यास मानेच्या आणि डोक्याच्या भागाजवळ सदोष स्थितीमुळे ताण येऊ शकतो. परिणामी सकाळी मान दुखणे,आकडणे असा  त्रास जाणवतो. तर  जाड उशीचा वापर केल्यास डोक्यावर ताण येऊन मान दुखवण्याची शक्यता असते. त्यामुळे उशीचा मऊसरपणा योग्य आहे याची खात्री करा.

उशीचे कापड :  

नायलॉन किंवा सिंथेटीक पेक्षा सुती कापडाची उशीची कव्हरं वापरणे अधिक पसंत करतात. यामुळे थंडावा राहण्यासाठी मदत होते. यामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. डॉ. अग्रवाल यांच्यामते, सुती कापडामुळे त्रास होत असल्यास फायबरचा वापर करा.

उशीचा जाडसरपणा किती असावा :

उशी खूपच जाड असेल तर मान पुढच्या बाजूला झुकण्याचा धोका अधिक असतो. यामुळे मानेचे दीर्घकाळ चालणारे दुखणे वाढते. तसेच घोरण्याचा आणि स्लीप अ‍ॅप्नियाचा त्रासदेखील वाढतो. त्यामुळे झोपमोड होण्याची शक्यता वाढते.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>