छायाचित्र सौजन्य – Shutterstock
उन्हाळ्यात सुर्याच्या प्रखर किरणांचा आणि उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होतो. बऱ्याच शारिरीक समस्यांचे मूळ हे आहारात आणि आपल्या पचन संस्थेत होणाऱ्या बदलांमध्ये असते. या काळात पित्तामध्ये वाढ होते. उष्णतेत वाढ झाल्याने शरीरातील व आतडय़ातील स्निग्धता नष्ट होते. परिणामी जड अन्न पचत नाही व शरीरात पाण्याची गरज वाढते.म्हणूनच या दिवसात आहारात हे काही बदल करण्याचा सल्ला लड्डा आयुर्वेदीक चिकित्सालयाचे डॉ.पवन लड्डा देतात.
- फळं -
उन्हाळ्याच्या दिवसात पाणीदार फळं आणि भाज्यांचा आहारात अधिक समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.मात्र म्हणून उघड्यावर कापून ठेवलेली फळं खाणे टाळा. उघडय़ावर कापून ठेवलेल्या फळांमधून-त्यावर बसलेल्या माशांमुळे टायफॉईड, कावीळ, गॅस्ट्रो अशा आजारांची लागण होण्याची शक्यता वाढते. फळांप्रमाणेच रसदेखील काळजीपूर्वक प्यावा.फळांचा रस ताजा प्यावा. उन्हाळ्यामध्ये उसाच्या रसवंतीवर खूप गर्दी होते. पण यातून बऱ्याचदा कावीळ, टायफॉइडची लागण होते.म्हणून अस्वच्छ रसवंतीवरील रस पिण्याचे टाळावे. उन्हाळ्यात हे ’5′ पदार्थ खाताना विशेष काळजी घ्या !
- आहार -
उन्हाळ्याच्या दिवसात आंबट,खारट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावेत.उलट गोड,कडू आणि कषाय(तुरट) स्वादाचे सेवन अधिक करावे.फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे पदार्थ खाऊ नयेत.ज्यांना उन्हाळा बाधत नाही अशांनी दह्याचे सेवन अधिक प्रमाणात करावे. दह्यातील उच्च मात्रेतील पोषकतत्वे आणि कॅल्शियम यामुळे आरोग्यास नक्कीच फायदा होतो. तसेच उन्हाळ्यातील हे’5′ त्रास दूर करण्यासाठी दही फायदेशीर ठरते . रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे. म्हशीच्या दुधात स्निग्धता अधिक असते. मधूमेहाचा त्रास नसल्यास साखरयुक्त दूध प्यावे. चविष्ट असले तरीही उन्हाळ्यात हे ५ पदार्थ अधिकप्रमाणात खाउ नयेत.
- पाणी -
उष्णतेमुळे या दिवसात शरीरातील पाण्याचे प्रमाण फार लवकर कमी होते.सतत घशाला कोरड पडत असल्यास पाण्याव्यतिरिक्त अधेमधे जिर्याचे पाणी प्यावे.याशिवाय गुढीपाडव्याला गुढीला घालण्यात येणार्या गाठींची माळ पाण्यात बुडवून त्याचे पाणी घरातील लहान मुलामुलींना दिवसातून एकदा प्यायला द्यावे. त्यामुळे लहानग्यांच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कायम राहण्यास मदत होते.त्याचबरोबर जिरेपूड किंवा काळेमीठ घालून ताक पिणे किंवा लस्सी, मठ्ठा प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होतो.गुळाचा खडा तोंडात ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्तवर्धकही आहे.
खाण्याच्या पथ्यपाण्यासोबतच उन्हांत फिरतानादेखील काळजी घेणे आवश्यक आहे.म्हणजे उष्माघाताचा किंवा डीहायड्रेशनचा त्रास उद्भवणार नाही.