Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’10′कारणांमुळे वाढतो मायाग्रेनचा त्रास !

$
0
0

मायग्रेन किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास हा व्यक्तीसापेक्ष विविध लक्षणांसोबत कमी-जास्त प्रमाणात आढळतो. आहारातील बदल, वातावरणातील बदल अशा एक न  अनेक कारणांमुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. मात्र मायग्रेनचा अ‍ॅटॅक अचानक येण्यामागील नेमके कारण प्रत्येकवेळी ओळखता येणे शक्य नाही.

मायग्रेनचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मायग्रेनचा त्रास वाढण्यामागील कारण काही विशिष्ट काळानंतर त्रास वाढवू शकतो. तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी डोकेदुखीचा त्रास वाढण्यामागील कारण हे वेगवेगळे असते.  मात्र सर्वसाधारणपणे ही 10 कारणं डोकेदुखीचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात. आल्याचा काढा – मायग्रेनच्या त्रासावरील गुणकारी उपाय

रूटीनमध्ये झालेले बदल –  

प्रत्येक व्यक्तीचे दैनंदीन वेळापत्रक ठरलेले असते. त्यामध्ये बदल झाल्यास मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. अति झोप किंवा कमी झोप, प्रवासादरम्यान अति आराम किंवा जेट लेग हे मायग्रेनचा अ‍ॅटॅक येण्यामागे कारणीभूत ठरते. त्यामुळे सुट्टीच्या दिवसातही वेळापत्रकात,झोपण्याच्या वेळेत बदल करू नका. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत होते.

वातावरण –

अचानक उष्णता किंवा थंडावा वाढणं किंवा कमी होणं यामुळे डोकेदुखी होऊ शकते. अचानक तीव्र स्वरूपाचा प्रकाशझोत  चेहर्‍यावर आल्यास, आवाजाची पातळी वाढल्यास मायग्रेनच्या अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. म्हणूनच उन्हांत बाहेर पडताना सनग्लासेस वापरा.

फूड –

टायरामिन Tyramine युक्त पदार्थ म्हणजे चॉकलेट,केळी, चीझ, व्हिनेगर, दही, सोया सॉस, आंबवलेले पदार्थ,रेड व्हाईन, आंबट फळं, कॉफी, शिळे अन्न याचे सेवन केल्यास डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. तसेच केमिकलयुक्त पदार्थ, मोनोसोडीयम ग्ल्युटॅमेटयुक्त पदार्थ, सल्फेट, नायट्रेटयुक्त पदार्थ यामुळेदेखील मायग्रेनचा त्रास वाढतो.

जेवण टाळणं – 

भूक लागल्यावर अंतुलित आहार घेण्याऐवजी साखरेचे पदार्थ खाल्ल्यास  किंवा जेवण टाळल्यास डोकेदुखी वाढते. उपासमार केल्याने रक्तातील साखर कमी होते आणि डोकेदुखी वाढते. त्यामुळे मायग्रेनचा त्रास टाळायचा असल्यास पोषणयुक्त आणि थोड्याथोड्या वेळाने खाण्याची सवय लावा. जेवण टाळल्याने शरीरावर होऊ शकतात हे 7 दुष्परिणाम !

स्त्रियांमधील हार्मोनल बदल – 

मासिकपाळीच्या दिवसात, गर्भारपणात किंवा मोनोपॉजच्या काळात स्त्रीशरीरात हार्मोनल बदल होतात. यामुळे काहीजणींची डोकेदुखी वाढते. ओरल कॉन्ट्रासेप्टीव्ह, हार्मोन रिपलेसमेंट थेरपी यामुळे मायाग्रेनचा त्रास अधिक वाढतो. मात्र योग्य औषधोपचारांनी त्यावर मात करता येते.

धुम्रपान आणि मद्यपान –  

रेड वाईन, डार्क बिअर, व्हिस्की यासारख्या अल्कोहोलयुक्त पेयांमुळे मायग्रेनचा त्रास वाढतो. त्यामुळे याचे सेवन टाळा. धुम्रपानाची सवय देखील मायग्रेन वाढवण्यास कारणीभूत ठरते. यामधील निकोटीन घटक रक्तवाहिन्यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतात तसेच नाक आणि गळ्यातील नसांना त्रास होतो.

ताण – 

मानसिक त्रास, काळजी, मानसिक थकवा, जीवनशैलीतील बदल, आनंद-दु:खाच्या टोकाच्या भावना यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे ताण तणाव वाढेल अशा परिस्थितींपासून दूर  रहा. संयम पाळा तसेच ताण कमी करणार्‍या आणि तुमच्या आवडीच्या कार्यामध्ये मन गुंतवून ताण हलका करा.

व्यायाम – 

व्यायामामुळे अनेक शारिरीक व्याधी दूर राहण्यास मदत होते. मात्र अचानक खूप हेवी व्यायाम केल्यास, सेक्सि अ‍ॅक्टीव्हिटी केल्यास मायग्रेनची डोकेदुखी वाढते. सलंब सर्वांगासन- ताण दूर करण्याचा उपाय तुम्ही वापरून पहा.

अत्तर / सेंट  – 

अचानक उग्रवासाचे अत्तर, परफ्यूम, पेंट थिनर, क्लिनिंग प्रोडक्ट, फूलं  यामुळे मायाग्रेनचा त्रास वाढू शकतो. मात्र अनेकदा नेमके  कारण स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे नर्व्हस सिस्टीम ( चेतासंस्थेवर ) परिणाम झाल्यास मायग्रेनचा त्रास वाढतो.

औषधं – 

काही औषधांमुळेदेखिल मायाग्रेनचा त्रास वाढू शकतो. ओरल कॉन्ट्रासेप्टीव्ह, रक्तदाबाची औषधं, हार्मोन रिपलेसमेंट औषध याचा अतिवापर केल्यास डोकेदुखीचा त्रास वाढतो. तसे जाणवल्यास डॉक्टरांच्या मदतीने औषधोपचारांमध्ये बदल करा.

References

Migraine Triggers. Migraine Fact Sheets. The Migraine trust

Surprising Headache Triggers. Web MD

Top 10 migraine triggers. Everyday Health

Migraine Triggers and How to Avoid Them. Healthline

Diseases and Conditions Migraine. Mayoclinic


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>